rat30p1.jpg
14349
रत्नागिरी : ग्राहक पंचायतीतर्फे खंडाळा येथे प्राचार्य शिवाजी जगताप यांचा सत्कार करताना संदेश सावंत. सोबत डावीकडून विलास कोळेकर, आशिष भालेकर, दीपक साळवी, उदय महाकाळ आदी.
अन्याय झाला तर ग्राहक पंचायतीकडे तक्रार करा
संदेश सावंत; खंडाळा येथील कॉलेजमध्ये कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः कोणत्याही क्षेत्रात कोणावर अन्याय झाला, लुबाडणूक झाली किंवा फसगत झाली तर संबंधिताने रितसर तक्रार करावी, दाद मागावी. ग्राहकाने ग्राहक पंचायतीशी संपर्क साधला तर निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत वचनबद्ध आहे. सर्वांनी सजग व जागृत राहण्याची खूप गरज आहे. ग्राहक पंचायतीकडे आतापर्यंत तक्रार दाखल केलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.
खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी तन्वी सावंत, पूर्वा बारगुडे आणि तनुजा पातये या विद्यार्थिनींसह प्राचार्य शिवाजी जगताप यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे ग्राहक दिनानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.
या प्रसंगी सैतवडे इंग्लिश स्कूलचे मुख्याधापक विलास कोळेकर म्हणाले, विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोरच सतत जागृत असले पाहिजे, चौकस असले पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. अन्यायाविरूद्ध योग्य त्या ठिकाणी दाद मागायला हवी. या वेळी जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव आशिष भालेकर, कोषाध्यक्ष दीपक साळवी, उदय महाकाळ आदी उपस्थित होते.