कोकण

रत्नागिरी- राधिका भिडे हिने जिंकली मने

CD

rat30p2.jpg-
14350
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात आय पॉपस्टार राधिका भिडे हिचा सत्कार करताना अॅड. सुमिता भावे.

‘फाटक’च्या स्नेहसंमेलनात गायिका
राधिका भिडे हिने जिंकली मने
रत्नागिरी, ता. ३० : फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून आय पॉपस्टार गायिका, संगीतकार, फाटक हायस्कूलची माजी विद्यार्थिनी राधिका भिडे हिने साऱ्यांची मने जिंकली. तिला विशेष निमंत्रित केले होते.
या प्रसंगी राधिकाचा सत्कार दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांनी केला.
या प्रसंगी मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, संस्था पदाधिकारी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी उपस्थित होते. राधिकाने सादर केलेल्या ‘मन धावतया आणि उजेड पडला छान गनोबा’ या लोकप्रिय गीताने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केलेल्या सुंदर सादरीकरणाने वातावरण उत्साही झाले. लोकनृत्य स्पर्धेत नववी-दहावीच्या गटात नववी ‘ई’चे गोंधळ नृत्य, दहावी ‘अ’चे वारकरी नृत्य आणि नववी ''अ''चे शेतकरी नृत्य यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन दिनेश नाचणकर व शिल्परेखा जोशी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Hockey : खरं बोलण्याची शिक्षा! पाकिस्तानच्या कर्णधारावर दोन वर्षांची बंदी, तर बोर्डाच्या प्रमुखांचा राजीनामा

Nashik Traffic News : बेशिस्त चालकांना बसणार दंडाचा फटका; नाशिक शहरातील सीसीटीव्ही अखेर अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Karachi Blast: भयंकर! कराचीमध्ये भीषण स्फोट! १६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटना नेमकी कशामुळे घडली?

Shivaji Maharaj Video : "जर १६७४ ला रायगडवर CCTV असतं तर..?" छत्रपती शिवरायांचा अस्सल काळ डोळ्यापुढे उभे करणारा व्हिडिओ व्हायरल

Stock Market : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला, 3 लाख कोटींचे नुकसान; कारण काय? कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT