14390
भाजपचीच सत्ता राहील असे काम करा
पालकमंत्री नीतेश राणे ः वेंगुर्लेतील विजयामुळे जबाबदारी, नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः आदर्श निवडणूक कशी लढवायची हे वेंगुर्लेने दाखवून दिले. पक्षाने दिलेला शब्द सर्वांनी तंतोतंत पाळला. त्याचे फलित म्हणूनच भाजपला एक हाती सत्ता मिळाली. नागरिकांना कामासंदर्भात दिलेले शब्द पूर्ण करा. आता जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात असे काम करा, की पुढील २५ वर्षे येथे सत्ता भाजपचीच राहील, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी वेंगुर्ले येथे केले.
येथील भाजप कार्यालयात आज सायंकाळी पालकमंत्री राणे यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेत निवडून आलेल्या भाजप नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रदेश सदस्य राजू राऊळ, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप, नवनिर्वाचित नगरसेवक सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर, रवींद्र शिरसाट, प्रीतम सावंत, गौरी माईणकर, गौरी मराठे, सुधीर पालयेकर, आकांक्षा परब, युवराज जाधव, विनय नेरुरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, सचिन शेटये, काजल कुबल यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राणे यांनी पराभूत उमेदवार श्रेया मयेकर, यशस्वी नाईक, प्रसाद गुरव यांचाही गौरव करून त्यांनीही केलेल्या कामाचे कौतुक केले.
राणे म्हणाले, ‘निवडणूक झाली म्हणजे निवडणूक काम झाले असे होत नाही. आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच घरोघरी पक्षही पोहोचण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. जे लोकप्रतिनिधी पक्षासाठी काम करणार नाही, त्यांना निधी द्यायचा की नाही, याचा विचारही केला जाईल, हे लक्षात ठेवावे.’
मनीष दळवी म्हणाले, ‘वेंगुर्लेचे यश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहे. पालकमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करून दिवसरात्र सर्वांनी मेहनत घेतली. त्यामुळेच हे यश मिळाले आहे. हे यश टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’ तालुकाध्यक्ष परब यांनी, वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये मिळवलेले यश हे पालकमंत्री राणे यांनी केलेले नियोजन आणि मार्गदर्शन त्यामुळेच मिळाले. म्हणूनच या विजयाचे तेच खरे ‘किंगमेकर’ आहेत, असे सांगत आभार मानले.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, मच्छीमार नेते दादा केळुसकर, वसंत तांडेल, वृंदा गवंडळकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सरपंच नीलेश सामंत, अवी दुतोंडकर, बंड्या पाटील, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते. निरीक्षक म्हणून असलेले राजू राऊळ, प्रशांत आपटे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसन्ना देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष परब यांनी आभार मानले.
....................
इतरही योजना, प्रकल्प राबवा
आरोग्याबाबत निवडणूक कालावधीत दिलेला शब्द आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. देशात स्वच्छतेमध्ये राज्यात आदर्शवत असलेल्या वेंगुर्ले पालिकेने आता चांगल्या योजना आणि नवीन प्रकल्प आणावेत. पक्षाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही, असेही पालकमंत्री राणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.