कोकण

खेड ः आर्यन क्लब, कसबा प्रशाला विजयी

CD

rat30p21.jpg-
O14397
खेड ः जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत विजयी झालेला मुलींचा आर्यन क्लब संघ.

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत
आर्यन क्लब, कसबा प्रशाला विजयी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने खेड तालुक्यातील आंबवली पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आणि आत्माराम फाउंडेशन यांच्यावतीने कै. शारदा आत्माराम यादव यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मुली गटात रत्नागिरीच्या आर्यन क्लबने तर मुलांमध्ये कसबा न्यू इंग्लिश स्कूलने विजेतेपद पटकावले.
आंबवली येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्हाभरातील सुमार २० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलींच्या गटात आर्यन स्पोर्ट्स क्लब अ संघाने आर्यन स्पोर्ट्स ब संघावर सहज मात केली. तर तिसरा क्रमांक आंबवली विद्यालयाला आणि चौथा क्रमांक आंबवली विद्यालयाच्या ब गटाने पटकावला. मुलांमध्ये अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल, कसबाविरूद्ध राजापूर अ संघ यांच्यात झाला. या स्पर्धेत तिसरा क्रमांक रत्नागिरीच्या श्री स्पोर्ट्स क्लबने आणि चौथा क्रमांक राजापूर ब गटाने पटकावला.
विजयी संघाला ७ हजार ७७७ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचे सचिव संजय यादव, चेअरमन विश्वासराव कदम, कार्यकारी मंडळाचे सचिव दीपक यादव, संचालक चंद्रशेखर यादव, चंद्रकांत महाडिक आदी उपस्थित होते. तसेच आत्माराम सर फाउंडेशनच्यावतीने अजय यादव, अवधूत मोरे, आत्माराम सर फाउंडेशनचे सचिव संगीता मोरे, अनंत कदम, ज्योती कदम तसेच प्राचार्य कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT