Rat30p15.jpg
14380
पालेः ग्रामपंचायत वेबसाईट अनावरणप्रसंगी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी सुनील खरात. सोबत डावीकडून ग्रामपंचायत अधिकारी मेघन चिले, पोलिस पाटील वैशाली माळी आदी.
ग्रामविकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रभावी
सुनील खरातः पाले ग्रामपंचायत वेबसाईटचे अनावरण, साफसफाई स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३०ः डिजिटल माध्यमांमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होणार असून, नागरिकांना विविध योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. ग्रामविकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे, त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकवर्गणीतून पाले ग्रामपंचायतीने तयार केलेल्या वेबसाईटच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम काल (ता. २९) ग्रामपंचायत कार्यालयात झाला. वेबसाईट बनवण्यासाठी मुंबईतील उद्योजक प्रशांत संसारे, उद्योजक दिनेश लेंडे यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची लोकवर्गणी दिली होती. या प्रसंगी गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्या हस्ते वेबसाईटचे औपचारिक अनावरण करण्यात आले. या वेळी धनराज संसारे, तंटामुक्त अध्यक्ष नीलेश रक्ते, पोलिस पाटील वैशाली माळी, जयेंद्र दुसार, शांताराम रक्ते, नथुराम वणे, संजीव लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी मेघन चिले, ग्रामस्थ तसेच महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती. या वेबसाईटमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून, नागरिकांना विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळणार आहे.
चौकट
एक दिवस गावासाठी
पंचायतराज अभियानांतर्गत पाले गावात स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. त्यात स्मशानभूमी, शाळा, मंदिर तसेच गावपरिसरात ग्रामस्थांनी साफसफाई केली तसेच गावात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील झाडीझुडपे तोडून प्रवास सुरक्षित केला. एक दिवस गावासाठी भावनेने ग्रामस्थ व महिलांनी स्वच्छ गाव सुंदर गाव, असा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.