कोकण

''स्वाभिमानी'' संघटनेतर्फे नांदगावात वस्तू वितरण

CD

14431

नांदगावात महिला सक्षमीकरणास हातभार
नांदगाव ः स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरण कार्यक्रमाचा प्रारंभ नांदगाव ओटव फाटा येथे नुकताच करण्यात आला. यामध्ये आटा चक्की, शिलाई मशीन, एलईडी टीव्ही व सायकल या वस्तू सवलतीच्या दरात मिळणार आहेत. याचे उद्घाटन नांदगाव सरपंच भाई मोरजकर व आयोजक सरिता राऊत, नीरज मोरये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नांदगाव येथे १५ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. बांधकाम कामगार, घरेलू कामगार, माथाडी कामगार आदींसह सर्व प्रकारचे संघटित व असंघटित कामगार तसेच शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सरिता राऊत, नीरज मोरये यांनी केले आहे.
....................
14432

सुराज साठेंचे अकॉर्डीयन वादन
म्हापण ः परुळे येथे राधारंग फाउंडेशनच्या (कै.) वसंत देसाई स्मृती गायन स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षक म्हणून उपस्थित असलेले विख्यात अकॉर्डीयन वादक सुराज साठे यांनी रसिकांच्या आग्रहास्तव अकॉर्डीयन वादन केले. त्यांची लीलया फिरणारी बोटे आणि त्यातून निघणारे स्वर ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. रसिकांच्या आग्रहाखातर साठे यांनी अनेक बहारदार गाणी सादर करत या वाद्याविषयी माहिती दिली. ही रसिकांसाठी पर्वणीच ठरली. पंचमदा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदनमोहन ते नदीम श्रवण यांच्यापर्यंत अनेक संगीतकारांकडे वादन करत लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांनी गायलेली विविध गाणी त्यांनी लीलया सादर केली. श्री. साठे यांनी ६० वर्षे बॉलीवूडसह संगीत क्षेत्रात अकॉर्डीयन वादनाने नावलौकिक मिळविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांच्याकडे इंडोनेशिया शिष्टमंडळाचे नेतृत्व, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये नियुक्ती

"मासिक पाळीवेळी बाहेरगावी आई पॅड वापरायला द्यायची नाही" सुधा चंद्रन यांचा धक्कादायक खुलासा; "तर दोष लागेल.."

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT