कोकण

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये साक्षी रामदूरकर उपविजेती

CD

14451

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये
साक्षी रामदूरकर उपविजेती
सावंतवाडी ः मुक्ताई ॲकॅडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदूरकर हिने शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त आयोजनाखाली रत्नागिरीतील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात साक्षी उपविजेती ठरली. तिने सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. साक्षीला सन्मानचिन्ह, रौप्यपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. येथील मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शखाली साक्षीने हे यश मिळविले. मागील चार वर्षे ती कॅरम आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळांत विभाग आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहे. सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी श्री. पेडणेकर यांनी आपले वडील आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक (कै.) सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
.......................
14452
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगीला सुवर्ण
सावंतवाडी ः चराठे येथील हेमांगी मेस्त्री हिने मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तिचे अभिनंदन करत दिल्ली येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल, बाळू वाळके, राजू कुबल, गजानन मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हेमांगीच्या या उल्लेखनीय यशामुळे चराठे गावासह सावंतवाडी तालुक्यातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT