rat30p16.jpg-
14381
रत्नागिरी : परकार हॉस्पिटल आणि रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे सीपीआर प्रशिक्षणादरम्यान प्रथमोपचार कीटचे वाटप करताना डॉ. अलिमियाँ परकार. सोबत राजन साळवी, नितीन तळेकर, जमादार, अविनाश कदम आदी.
रिक्षाचालकांनो कुटुंबासह स्वतःची काळजी घ्या
डॉ. अलिमियाँ परकार; सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : प्रत्येक माणूस हा समाजाचा एक उपयुक्त घटक आहे. समाजासाठी काम करताना त्याला योग्य मानसन्मान मिळायलाच हवा; मात्र, समाजाचे ऋण फेडत असताना आपल्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही स्वतःच्या देहाचे संरक्षण आणि संवर्धन केले नाही तर दुसरा कोणीही ते करणार नाही. सीपीआरचे प्रशिक्षण एखाद्या माणसाचा जीव वाचवू शकतात, असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले. परकार हॉस्पिटलच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
परकार हॉस्पिटल आणि रिक्षाचालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर (हृदयविकाराचा झटका आल्यानंतर करण्यात येणारा प्राथमिक उपचार) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी माजी आमदार राजन साळवी, ''सकाळ''चे बातमीदार राजेश शेळके, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, माजी नगरसेवक सलील डाफळे, अविनाश कदम, नितीन तळेकर, सुभाष गोताड, सलीम जमादार, डॉ. अनुराधा लेले आदी उपस्थित होते. त्यांना सीपीआरचे तज्ञ डॉक्टरांकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. परकार हॉस्पिटलतर्फे प्रथमोपचार कीट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. परकार म्हणाले, सतत बसून राहण्याचे धोकेरिक्षाचालक किंवा एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याला धोकादायक आहे. तासनतास बसून राहिल्यामुळे पायांमध्ये गाठी होण्याच्या समस्या निर्माण होतात. व्यवसायाचा गाडा सांभाळताना शरीराकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रस्ते अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रिक्षाचालक हे ''प्रथम प्रतिसादक'' म्हणून काम करत असतात, त्यामुळे हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी जीवनदायी ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.