कोकण

समाजासाठी उपयोगी पडणारे शिक्षण घ्या

CD

14503

समाजासाठी उपयोगी पडणारे शिक्षण घ्या

आर. जे. पवार ः मिठबांव रामेश्वर हायस्कूल शताब्दी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ३० ः विद्यार्थ्यांनी नोकरीच्या दृष्टीने शिक्षण न घेता समाजाच्या उपयोगी पडेल असे शिक्षण घ्यावे, असे मत देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांनी येथे व्यक्त केले. मिठबांव येथील रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अद्यापक महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संस्था मिठबांव संचलित रामेश्वर हायस्कूल मिठबांवचा शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय मिठबांवचा अमृत महोत्सव कार्यक्रम मिठबांव येथे आयोजित केला होता. व्यासपीठावर क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, मिठबांव सरपंच भाई नरे, विश्वस्त अंकुश डगरे, भीमसेन आचरेकर, चंद्रशेखर फाटक, धर्माजी गावकर, रामचंद्र वाळके, रवींद्र कुवेसकर, माजी सभापती सुनील पारकर, आबा लोके, बी. एस्. डगरे, अमोल लोके, एम्. के. लोके, बी. के. चव्हाण आदी उपस्थित होते.
भालचंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार पवार म्हणाले, ‘ही संस्था अशीच शिक्षणाची ज्योत पिढ्यानपिढ्या उजळत राहो व येथील विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल होवो. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी करण्यासाठी शिक्षण न घेता शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, असे शिक्षण घ्यावे. या गावात तलाठी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीमुळे पदोन्नतीच्या माध्यमातून नायब तहसीलदार झालो. त्यानंतर पुढे तहसीलदार म्हणून कणकवलीत गेलो. येथील लोकांनी दिलेले प्रेम व आपुलकी यामुळे या तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करता आले. या संस्थेने शताब्दी महोत्सव व अमृत महोत्सवनिमित्ताने मला येथे आमत्रिंत केले याबद्दल या संस्थेचा ऋणी राहीन.’ राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. राऊत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT