14508
विषय सभापती निवड
वैभववाडीत बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक बिनविरोध झाली. समितीच्या बांधकाम सभापतिपदी रणजित तावडे यांची पुन्हा वर्णी लागली, तर शिक्षण सभापती सुभाष रावराणे, महिला व बालकल्याण सभापतिपदी सानिका रावराणे यांची बिनविरोध निवड झाली. तीन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.