rat३०p३५.jpg-
१४४६९
रूद्र कदम व प्रशिक्षक
सलग ५३ तास स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम
रूद्र कदम; उपळे-लांजा येथील मूळ रहिवासी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः तालुक्यातील उपळे येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत मीरारोड येथे स्थायिक झालेला रूद्र कदम याने बेळगाव कर्नाटक येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत सलग ५३ तास स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबतचे पत्र गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यामार्फत नुकतेच प्राप्त झाले आहे.
२३ ते २७ ऑक्टोबरदरम्यान या उपक्रमाचे आयोजन शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब, बेळगाव यांच्यामार्फत करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील अनेक स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशिक्षक संतोष मिश्रा यांच्या हाताखाली रूद्र हा गेल्या दोन वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे; परंतु अवघ्या दोन वर्षाच्या प्रशिक्षणाच्या जोरावर रूद्रने इतकी उंच भरारी घेतली आहे.
या आधी१५ ऑगस्टला मुंबई मीरारोड जीसीसी क्लब येथे झालेल्या एका स्पर्धेत सहभागी होऊन १ तास १९ मिनिटं न थांबता स्केटिंग करून रूद्रने जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, यूएन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन रेकॉर्ड बूकमध्ये आपल्या नावाची यशस्वी नोंद केली आहे.
रूद्र हा पाचवीत शिकत आहे. तो इतरही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. त्याची जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत यामुळे आज त्याला हे यश मिळालेलं आहे त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
कोट
आमच्या कुटुंबाला व संपूर्ण गावाला रूद्रने केलेल्या कामगिरीचा अभिमान वाटतो. आमच्या घरातील लहान पिढीने आकाशाला गवसणी घातल्याचं आम्हाला विशेष कौतुक आहे.
- कमलाकर कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.