कोकण

पावस - वृद्ध महिलांच्या सान्निध्यात केला वाढदिवस साजरा

CD

काही सुखद - लोगो

rat31p5.jpg
14629
पावसः येथील आनंदी अनुसूया महिला वृद्धाश्रमातील महिलांना वाढदिवसानिमित्त वस्तूंचे वाटप करताना निलेश भाटकर.

वृद्ध महिलांच्या सान्निध्यात केला वाढदिवस साजरा
नीलेश भाटकरांचा उपक्रम ; गरजेच्या वस्तुंसह धान्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३१ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे पोलीस पाटील नीलेश भाटकर यांनी आपला वाढदिवस पावस येथील आनंदी अनुसया महिलाश्रमातील वृद्ध महिलांच्या सान्निध्यात साजरा केला. त्या महिलांना आवश्यक वस्तू व धान्याचे वाटप केले.
गोळप येथील पोलीस पाटील श्री. भाटकर हे गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहेत. ते प्रत्येकाच्या अडीअडचणीवेळी मदत करीत असतात. गेली काही वर्षे त्यांनी पावस येथील आनंदी अनुसूया या वृद्ध महिलाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करण्यास सुरवात केली आहे. त्या आश्रमात अनेक उपेक्षित महिला आपले जीवन व्यतीत करीत आहेत. घरच्या मंडळींपासून दूर असल्यामुळे त्यांना घरातील कोणत्याही कार्यक्रमाच आनंद घेता येत नाही. या दृष्टिकोनातून श्री. भाटकर यांनी आपला वाढदिवस दरवर्षी याच महिलाश्रमात साजरा करायचा निश्चय केला. तसेच त्याची अंमलबजावणीही सुरू केली. नुकताच भाटकर यांनी आपला वाढदिवस महिलांच्या उपस्थितीत साजरा केला. त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापल आणि त्या महिलांबरोबर संवादही साधला. त्यांना आवश्यक वस्तू व धान्यांचे वाटप केले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन त्यांनी घडवून आणले.
यावेळी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सिंग पाटील, अवधूत सुर्वे, महेश कुबडे, प्रकाश झोरे, महेश मुरकर, सुदेश शिंदे, नंदकुमार मुरकर, नेताजी पाटील, जितेंद्र शिरसेकर, प्रवीण शिंदे, महिला श्रमाच्या संचालिका राधा गौरव फडके, चेतना खातो आणि परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते.

कोट
वाढदिवसासारख्या कार्यक्रमांमधून महिलाश्रमातील महिलांना आधार मिळतो. हाच आदर्श प्रत्येकाने ठेवल्यास समाजातील उपेक्षित घटकांना मदत होईल आणि त्यामधून आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही भावना जागृत होईल.
- नंदकुमार मुरकर, गोळप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Decision : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत, नव्याने शासन निर्णय जारी

Nanded News : किनवट येथे विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले; मृत्यूपूर्वी आई-वडिलांविषयी सोशल मीडियावर भावनिक स्टेटस!

Thane Water Supply: नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई झळ, ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन

Ladki Bahin Yojana: पटकन् मोबाईल चेक करा, लाडक्या बहिणींचे पैसे आले; किती हप्ते जमा?

Kannad Farmers Protest : मका नोंदणी होऊन महिना उलटला तरी खरेदी नाही; शेतकऱ्यांचा १२ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचा इशारा!

SCROLL FOR NEXT