14690
अचानक क्रिकेट क्लबतर्फे
ऋतुजा पेडणेकरचा सत्कार
बांदा, ता. ३१ ः येथील डॉ. ऋतुजा पेडणेकर हिने फिजिओथेरपीमध्ये पदवी प्राप्त केल्याने तिचा येथील अचानक क्रिकेट क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. क्लबचे सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केले. यावेळी क्लब सदस्य शामकांत काणेकर, सतीश येडवे, अभय नाईक, हुसेन मकानदार, संदीप येडवे, पंपी गोवेकर, चंदू वाळके, राजेश गोवेकर, रंजन पेडणेकर, वडील राजन पेडणेकर, भाऊ आदेश, आई राजलक्ष्मी व बहीण वैदेही केळुसकर आदी उपस्थित होते. यावेळी शामकांत काणेकर यांनी ऋतुजाचे अभिनंदन करून बांदा गावासाठी ही भूषणावह बाब असल्याचे सांगितले. ऋतुजा हिने माध्यमिक शिक्षण खेमराज हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समधून फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. भविष्यात गावासाठी खूप काही रण्याची इच्छा आहे. अचानक क्रिकेट क्लबने केलेल्या सत्कारामुळे अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यापुढे स्पोर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणार असल्याचे सांगितले. हुसेन मकानदार यांनी आभार मानले.
....................
14695
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सान्वी, श्रावणी प्रथम
कुडाळ, ता. ३१ ः येथील रोटरी क्लब आयोजित रोटरी फेस्टिव्हलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ५ ते ११ वयोगटात सान्वी म्हाडदळकर प्रथम, तर १२ ते १६ वयोगटात श्रावणी आरवंदेकर प्रथम आली. स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
परीक्षक म्हणून नीलेश जोशी व भूषण तेजम यांनी सहकार्य केले. गटनिहाय निकाल अनुक्रमे असा ः ५ ते ११ वर्षे-सान्वी म्हाडदळकर, अन्वी साळगावकर, श्रेयाण किनळेकर, उत्तेजनार्थ मृणाल तौर. १२ ते १६ वर्षे-श्रावणी आरवंदेकर, मुद्रा होतरे, शमिका आरवंदेकर, उत्तेजनार्थ ध्रुव टेमकर. यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आली. स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून श्वेता नाईक, रुपेश तेली यांनी काम पाहिले. नीलेश गुरव व बादल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.