परुळे येथे उद्यापासून
राज्य एकांकिका स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३१ ः परुळे युवक कला क्रीडा मंडळ, परुळे आयोजित ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २ ते ५ जानेवारी या कालावधीत श्री देव आदिनारायण मंदिर रंगमंच येथे होणार आहे.
शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन, सायंकाळी सातला बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ ‘वन सेकंद लाईफ’, रात्री ८ वाजता अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती व आर्यरुप नाट्यसंस्था सांगली यांची ‘इन सर्च आफ्’, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरुर देवराई गंधर्व थिएटर्स मीरारोड, कडी कारवा कोल्हापूर ‘म्हव उठलाय’, शनिवारी (ता. ३) इंद्रधनू रंगमंच बोरिवलीची ‘द फँटसी’, मीनलताई शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी यांची ‘आभाळाएवढी माया’, थिएटरवाले मुंबई यांची ‘हिरो नंबर वन’, रंगवलय, अंधेरी यांची ‘बार बार’, अक्षरसिंधू साहित्य कलामंच कणकवली यांची ‘भरकट’, रविवारी (ता. ४) पृथा थिएटर्स वेंगुर्ले यांची ‘अमृतस्यपुत्र, कलांकुर मालवण यांची ‘उकळी’, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज कोल्हापूर यांची ‘ग्वाही’, नाटकवेडे रत्नागिरी यांची ‘श्यामची आई’
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर यांची ‘हाफ वे’, सोमवारी (ता. ५) सायंकाळी ६.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ आणि भावगीत गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा श्री देव आदिनारायण मंदिर रंगमंच, परुळे येथे होणार आहे. नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.