कोकण

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर आज स्वच्छता मोहीम

CD

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर
आज स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून उद्या (ता.१) श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात जिल्हावसीयांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटन व स्वच्छ जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे पाहता यावे या हेतूने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरीता उद्या श्रमदानाच्या माध्यमातून समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत पंचायत समिती देवगड, मालवण, वेंगुर्ले यांना या कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामस्थ यांचा सहभाग घेऊन श्रमदान करावे, असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rabies injection: तीन इंजेक्शन देऊनही रेबिजमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; वैद्यकीय अधीक्षक म्हणतात...

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

'इन्स्पेक्टर मंजू'मध्ये विलनची एन्ट्री! सत्या आणि मंजू होणार वेगळे? प्रोमो पाहून चाहत्यांची धडधड वाढली

Theur Crime : थेऊरमध्ये विवाहितेचा ४ वर्ष अमानुष छळ; पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

Muslim Quota: महाराष्ट्रात मुस्लिमांना कोणत्या सरकारने कधी आणि कसे आरक्षण दिले होते? महायुतीने ते रद्द का केले? जाणून घ्या इतिहास...

SCROLL FOR NEXT