कोकण

नववर्ष स्वागताच्या फसव्या संदेशांपासून सतर्कता बाळगा

CD

14608

नववर्ष स्वागताच्या फसव्या
संदेशांपासून सतर्कता बाळगा

पोलिस निरीक्षक मगदूम यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे नववर्ष स्वागत शुभेच्छांच्या नावाखाली ‘एपीके’ फाईल असलेले संदेश मोबाईल धारकांनी डाऊनलोड करू नये. ते सायबर फसवणूक करण्याचे प्रकार असू शकतात. त्यामुळे अशा संशयास्पद संदेशांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रोटरी महोत्सवात केले.
यावेळी निवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड व रोटरी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. मगदूम म्हणाले की, सध्या व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर ''हॅप्पी ''न्यू इयर'' अशा स्वरुपाचा संदेश पाठवून, त्यासोबत एपीके फाईल पाठविली जात आहे. ही फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल केल्यास मोबाईल हॅक होण्याची, ओटीपी व बँकिंग संबंधित गोपनीय माहिती चोरीस जाण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. नागरिकांनी अशा फेक संदेशांपासून सावध राहावे. ओळख नसलेली कोणतीही एपीके फाईल डाउनलोड करू नये. तसेच संशयास्पद लिंक किंवा एपीके फाईल पुढे फॉरवर्ड करू नये. कोणतीही फाईल डाउनलोड करण्यापूर्वी तिचा स्रोत आणि विश्वासार्हता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची फाईल चुकून इन्स्टॉल झाली असल्यास किंवा सायबर फसवणूक झाली असल्यास तत्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Latest Marathi News Live Update : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT