कोकण

तोंडवली इस्वलकरवाडी रस्त्याची दैना

CD

14640

तोंडवली इस्वलकरवाडी रस्त्याची दैना

स्थानिक त्रस्त; तातडीने डागडुजीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३१ ः देवगड-निपाणी मार्गावरून तोंडवली इस्वलकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. दोन वर्षांपासून हा रस्ता नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ प्रमोद इस्वलकर, रिक्षाचालक ‌किशोर मोरये (नांदगाव) यांनी केली आहे.
‘हा रस्ता दिवसेंदिवस वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. या धोकादायक रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अनेकवेळा अपघात झाले आहेत. या मार्गावर पायी चालणेही कठीण झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतरही या मार्गाचे काम दुर्लक्षित राहिले आहे. याच मार्गावर महाविद्यालय असल्याने सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थी दररोज या मार्गावरून ये-जा करत असताना अनेक वेळा विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत. या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी अनेक निवेदने, मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासन डोळेझाक करीत आहे,’ असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात आता मुस्लिमांना आरक्षण नाही, फडणवीस सरकारने ५ टक्के आरक्षणाचा आदेश केला रद्द

T20 World Cup: नामिबियाचा पाकिस्तानला धक्का? आज साखळी फेरीतील अखेरची लढत; सुपर-८ साठी कसं आहे समीकरण?

Emmanuel Macron : फ्रान्स राष्ट्राध्यक्षांनी कोल्हापूरच्या कन्येचं केलं कौतुक, लीना नायर यांचा जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा

Supreme Court On AI : एआयचा वापर न्याय व्यवस्थेसाठी धोक्याचा, सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

'भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल खेद'; टिपू सुलतान प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली दिलगिरी

SCROLL FOR NEXT