rat31p6.jpg-
O14630
उडपी : येथे कोटी गीता उपक्रमात गीता पठण करताना स्वानंद पठण मंडळातील महिला.
-------
काही सुखद---लोगो
लहान मुले, महिलांना शिकवणार गीता पठण
स्वानंद मंडळ ; २५ वर्षे पठण उपक्रमाचा विक्रम
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : सलग २५ वर्षे श्रीमद् भगवद्गीता पठण, सप्तशती पठण करणाऱ्या स्वानंद पठण मंडळाने २०२६ मध्ये लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी गीता पठण शिकवण्याचा संकल्प केला आहे. इयत्ता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना गीता मुखोद्गत असावी, असा मंडळाचा विचार आहे. आज ४० हून अधिक महिला यात सक्रिय असून त्यांची संख्या १०० पर्यंत नेण्यासाठी मंडळ उपक्रम करत आहे. शंकराचार्य विरचित विविध स्तोत्रे, संस्कृतचे संस्कार व त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे व्रतच हे मंडळ पार पाडत आहे.
यासंबंधी मंडळाच्या प्रमुख सौ. अश्विनी जोशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मंडळाची माहिती दिली. साधारण २००० सालामध्ये शुभांगी अभ्यंकर यांच्याकडे अश्विनी जोशी, ज्योती काळे, भारती हळबे व श्रीमती खाडिलकर या चार मैत्रिणी भगवद्गीता शिकण्यास जाऊ लागल्या. भगवद्गीतेची आवड निर्माण झाली आणि अर्ध्या तासाची शिकवणी एक तासावर पोहोचली आणि शिवमहिम्न, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी, दासबोध यांचेही वाचन, पठण सुरू झाले. त्यानंतर अश्विनी जोशी यांनी टिळक आळी येथील त्यांच्या सदनिकेत १०-१२ जणींसोबत आठवड्यातून चार दिवस या सर्व ग्रंथांचे पठण व शिक्षण सुरू केला. आज ही संख्या ४० वर पोहोचली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी गीतेचा एक अध्याय पठण करण्याचा उपक्रम सुरू आहे.
सौ. विशाखा भिडे यांचेही नारायणी पठण मंडळ असून तिथे त्या सप्तशती पाठ शिकवतात. त्यामुळे त्यांनाही टिळक आळीत बोलावून सर्व महिलांना सप्तशतीचे पठण शिकवले. यामुळे या सर्व महिलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे. शृंगेरीच्या शंकराचार्यांसमोर भगवद्गीता तोंडपाठ म्हणण्याच्या उपक्रमात स्वानंद पठण मंडळाच्या योजना घाणेकर, अश्विनी जोशी आणि मीरा नाटेकर यांनी सुयश मिळवले आहे. आजही मंडळातील सर्व महिलांची गीता पाठ आहे. वेगवेगळ्या महिलांच्या घरी दर एकादशीला पूर्ण भगवद्गीता पठण केले जात आहे. सध्या त्रिसुपर्ण सूक्तही महिला शिकत आहेत.
-----------
चौकट
साडेतीन शक्तीपीठे, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि अंबेजोगाई येथे जाऊन सप्तशती पठण करण्याचा उपक्रम दहा वर्षांपूर्वी या महिलांनी राबवला होता. त्यावेळी तिथल्या अनेकांनी सप्तशती ऐकून उच्चार व ग्रुपचे विशेष कौतुक केले होते. त्याचप्रमाणे उडपी येथे कोटी गीता लेखन यज्ञात सर्व ६० जणींनी गीता पठण केले होते. याशिवाय संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत सप्ताहानिमित्त मंडळाने ''स्तोत्रकाव्यांजली'' हा अनोखा कार्यक्रम सादर केला. साठे न्यास, चिपळूण आणि संस्कृत भारतीतर्फे मंडळाचा सन्मान झाला आहे.
--------
कोट
पठण मंडळामुळे सर्व महिलांमध्ये सकारात्मक वृत्ती वाढीस लागली. मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी संस्कृत पठण उपयुक्त आहे. आमचे आता हे एक कुटुंबच बनले आहे. त्यामुळे मंडळातून आजवर कोणत्याही महिनेने पठण सोडले नाही. सर्वांच्या घरच्या मंडळींचे या मंडळाला खूप सहकार्य लाभते.
--सौ. अश्विनी आनंद जोशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.