at31p14.jpg-
14658
गोठे: सारिका पवार हिच्या पालकांची भेट घेवून समुपदेशन करताना शिक्षक दिलीप मराठे, रजनी जाधव, भाग्यश्री जाधव.
rat31p15.jpg-
14659
सारिका पवार हिला शालेय गणवेश देताना शिक्षिका रजनी जाधव, दिलीप मराठे व सोबत विद्यार्थी.
-------------
विधायक - लोगो
समुपदशाने आदिवासी मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात
गोठे बोरखत शाळेचा दीपस्तंभ; पालकांचे मन वळवले
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ ः ग्रामीण भागातील स्थलांतर आणि घटता शालेय पट शाळांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. संचमान्यता समायोजनामुळे अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित राहिलेली नाही. एका आदिवासी मुलीला आणि तिच्या पालकांना शिक्षणासाठी प्रवृत्त करत शिक्षकांनी सामाजिक परिवर्तनाचे कार्य केले आहे. शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या मुलीच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा गोठे बोरखत यांचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. नव्या वर्षातील हे आशादायी आणि प्रेरणादायी उदाहरण समाजास सकारात्मक संदेश देणारे आहे.
कामानिमित्त गावाच्या आजूबाजूला आलेल्या भटक्या आदिवासी समाजातील एका मुलीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत शिक्षकांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. बोरखत फाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या वेरळ आदिवासी वाडीजवळ पाहुणी म्हणून आलेली सारिका विष्णू पवार (मूळ गाव बोरघर हवेली, ता. तळा, जि. रायगड) सहावीत शिकत असताना शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात येताच शाळेतील शिक्षक दिलीप मराठे, रजनी जाधव आणि भाग्यश्री जाधव यांनी थेट रानात जावून तिच्या पालकांशी संवाद साधत समुपदेशन केले. शिक्षणाचे महत्त्व, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि मुलींच्या शिक्षणाची गरज याविषयी सखोल मार्गदर्शन करून पालकांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर तिच्या मूळ गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि गोठे बोरखत शाळेत तिचे नाव दाखल झाले. मात्र स्थलांतरित जीवनशैलीमुळे सारिकाच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढत होते. हे आव्हान ओळखून शिक्षकांनी पुन्हा पुन्हा कुटुंबाची भेट घेत, शाळेचे वेळापत्रक कसे सांभाळावे, शिक्षणात सातत्य का आवश्यक आहे, याबाबत संयमाने समजावून सांगितले. शैक्षणिक अभ्यास भेटी व विविध अनुभवांच्या माध्यमातून तिच्यातील बौद्धिक क्षमता जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सारिका शंभर टक्के सक्रिय झाली असून तिला शिक्षणाची खरी आवड निर्माण झाली आहे.
चौकट
शैक्षणिक उपक्रम, क्रीडा स्पर्धेत सहभाग
सारिकाला शालेय गणवेश, पुस्तके व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शाळेची गोडी लागावी यासाठी तिच्या आवडीनुसार अभ्यास व उपक्रमांची संधी देण्यात आली. क्रीडा स्पर्धा, शालेय उपक्रम परसबाग यामध्ये ती मग्न झाली. या प्रयत्नांची सकारात्मक परिणीती अशी झाली की, सारिका हळूहळू शाळेत रमू लागली. क्रीडा स्पर्धा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांत ती उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.