14700
अवैध उत्खनन वादातून रस्ता अडवला
तक्रार केल्याचा राग; घराकडे जाणाऱ्या मार्गावर ओतला माती ढिग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः सांगली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड गोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविल्याचा प्रकार सांगेली येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी जमीन मालक श्रीकांत खोत यांनी १०० नंबरला तातडीने तक्रार नोंदविल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत सावंतवाडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगेली येथील नदीपत्रातील वाळू आणि दगडगोटे यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रा राजकुमार राऊळ यांच्यासह श्रीकांत खोत व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना उत्खननाबाबतचे परवाने सादर करण्यास सांगितले होते. मात्र, ते परवाने सादर करू शकले नाहीत. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. असे असताना मंगळवारी रात्री तक्रारदार खोत यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला. याबाबत खोत यांनी १०० नंबरला तक्रार दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ज्यांनी माती ओतली त्यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी येण्यास सांगितले. आज सकाळी याबाबत पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे वाळू माफीयांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
..................
कोट
सांगेली येथे माती ओतून रस्ता अडविण्याचा झालेला प्रकार हा वैयक्तिक वादातून आहे. त्या संदर्भात पोलिस प्रशासनाकडून दखल घेतली आहे. माझ्याकडे तशी अद्याप तक्रार नाही. दुसरीकडे त्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी काढलेला नदीतील गाळ वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी भरून परवानगी दिली होती. मात्र, सततच्या तक्रारीमुळे ती परवानगी ही रद्द केली आहे. रस्ता अडवल्याप्रकरणी माझ्याकडे तक्रार आल्यास पुढील कार्यवाही करु.
- श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.