कोकण

नेमळेत रविवारपासून शिष्यवृत्ती मार्गदर्शन

CD

नेमळेत रविवारपासून
शिष्यवृत्ती मार्गदर्शन
सावंतवाडी ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप कामळेवीर आणि नेमळे हायस्कूल, नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकदिवसीय मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. मार्गदर्शन वर्ग रविवारी (ता. ४) सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत नेमळे हायस्कूल (ता. सावंतवाडी) येथे होणार आहे. विलास गोठोस्कर (बुद्धिमत्ता), भालचंद्र आजगावकर (मराठी), कादंबरी भोसले (इंग्रजी), सहदेव घाडी (गणित) हे अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करतील. हे वर्ग निःशुल्क असून विद्यार्थ्यांनी स्वतःचा डबा, पाण्याची बाटली, वही, पेन आदी साहित्य सोबत आणावे. सकाळी अल्पोपहार देण्यात येईल. विद्यार्थ्यांना वर्गात आणणे व परत नेणे ही जबाबदारी पालकांची राहणार आहे. विलास गोठोस्कर यांच्याशी संपर्क साधावा.
.................
सावंतवाडीत
पोलिस बंदोबस्त
सावंतवाडी ः ‘थर्टी फर्स्ट’ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवला आहे. थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शहरात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. प्रत्येक नाक्यावर वाहतूक पोलिस तैनात केले जाणार आहेत. वाहने पार्किंग करतानाही काळजी घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे. सुसाट वेगाने व कर्णकर्कश आवाजात दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
----
निवृत्त कर्मचाऱ्यांचे
१० ला स्नेहसंमेलन
कुडाळ ः प्रधान रक्षा लेखा नियंत्रक (नौसेना) निवृत्त ऑफीसर, ऑडिटर, लिपीक व इतर कर्मचाऱ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (ता.१०) सकाळी १० ते ३ या वेळेत अॅडमिरल हाऊस कुपरेज रोड कुलाबा येथे आयोजित केले आहे. ज्या कर्मचाऱ्याचे वय ७५ वर्ष आहे, त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तरी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी विजय खाडिलकर, विनोद माने, अनिल आपटे, संजय निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आंगणेवाडी येथील निवृत्त अधिकारी बाळा आंगणे यांनी केले आहे.
...................
सातार्डा काळोबा
३ रोजी जत्रोत्सव
सावंतवाडी ः सातार्डा-भटवाडी येथील श्री काळोबा देवस्थानचा शनिवारी (ता.३) जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, रात्री ११ वाजता पावणी त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव काळोबा देवस्थान कमिटीने केले आहे.
------------
संस्कृत कथाकथन,
स्तोत्र पाठांतर स्पर्धा
सावंतवाडी ः येथील पंचम खेमराज महाविद्यालयात ११ जानेवारीला स्तोत्र पाठांतर स्पर्धा व संस्कृत कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ९.३० ते १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी ५ जानेवारीपर्यंत ज्योती राऊळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FMCG Price: स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! साबणापासून बिस्किटांपर्यंत जीवनावश्यक वस्तू महाग होणार; किंमती किती वाढणार?

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

T20 World Cup मधून बाहेर गेलेच, पण ऑस्ट्रेलिया आता ऑलिम्पिकलाही मुकणार? न्यूझीलंड कागांरूंचा बिघडवणार खेळ

"शेवटच्या दिवशी मेघाने..." बिग बॉस मराठी पहिल्या सीझनच्या विनरविषयी आस्तादचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT