कोकण

रत्नागिरी- राजेंद्र बाईत यांना दर्पण पुरस्कार

CD

rat31p7.jpg-
O14637
राजेंद्र बाईत, सुशील कुलकर्णी, नयना सहस्त्रबुद्धे
-------------
‘सकाळ’चे राजेंद्र बाईत यांना दर्पण पुरस्कार
केजीएन, कऱ्हाडे ब्राह्मण संघः नयना सहस्रबुद्धे, सुशील कुलकर्णी यांची व्याख्याने
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन व रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी केले आहे. याप्रसंगी संघाचा दर्पण पुरस्कार ''सकाळ''चे राजापूरचे प्रतिनिधी राजेंद्र तुकाराम बाईत यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नयना सहस्रबुद्धे यांचे ‘बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबांसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान होईल तर ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता युट्यूबर सुशील कुलकर्णी यांचे ‘माध्यमांचा विळखा आणि तरुणाई’ या विषयावरील व्याख्यान होईल, अशी माहिती कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे व केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त श्री. बाईत शीळ (राजापूर) येथील रहिवासी असून २० वर्षे पत्रकारितेत आहेत. वाणिज्य पदवीधर आणि पत्रकारितेची पदविका त्यांनी घेतली आहे. ‘सकाळ’मध्ये राजापूर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना राज्य शासन पर्यटन संचालनालय यांचा पर्यटन मित्र पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर त्यांनी स्वतंत्र लेखन केले आहे. राजापूर तालुक्‍यासह शहराचा पाणीप्रश्‍न, ब्रिटिशकालीन वखारीचा मागोवा आदी विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. ‘सकाळ’मधील बिग स्टोरीसाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प, पर्यटन व्यवसायातील संधी, हवामानातील बदल आणि शेती, आंबा-काजू व्यवसायातील समस्या, पूररेषा आदी विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT