कोकण

मृत्यूनंतरही आजींची दृष्टी राहणार अमर

CD

14715

मृत्यूनंतरही आजींची दृष्टी राहणार अमर

सावंतवाडीतील सविता धारणकरांकडून नेत्रदान

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. ३१ ः आपल्या मृत्यूनंतरही कोणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि कोणाला तरी ही सृष्टी पाहता यावी, या उदात्त भावनेतून सावंतवाडी-भटवाडी येथील श्रीमती सविता धारणकर यांनी मृत्यूनंतर नेत्रदानाचा घेतलेला संकल्प त्यांच्या वारसांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केला. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ निर्णय घेत नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली, ज्यामुळे आज सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
​भटवाडी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सविता धारणकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ‘आपल्या पश्चात आपले डोळे कोणा अंध व्यक्तीला मिळावेत,’ अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर दुःखाच्या प्रसंगातही ही इच्छा शिरोधार्य मानून त्यांचे सुपुत्र रघुनाथ धारणकर आणि नातू भार्गव धारणकर यांनी विलंब न लावता पावले उचलली. नेत्रदानाच्या या कार्यासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने धारणकर यांच्या घरी येत नेत्रदानाची प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केली. दान केलेले हे नेत्र पुढील उपचारांसाठी आणि गरजू रुग्णांवर प्रत्यारोपणासाठी कोल्हापूर येथील आय बँकेत पाठवले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत नातू भार्गव धारणकर यांनी विशेष पाठपुरावा करून आपल्या आजीची अंतिम इच्छा पूर्ण केली.​ नेत्रदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत धारणकर आजींचे हे पाऊल आणि त्यांच्या कुटुंबाने दाखवलेली तत्परता यामुळे सावंतवाडी परिसरातून धारणकर कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या दानामुळे दोन व्यक्तींच्या आयुष्यात नवी दृष्टी मिळणार असून, मृत्यूनंतरही समाजासाठी प्रकाश देण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे.
-----------------
कोट
अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश यावा, ही माझ्या आजीची मोठी तळमळ होती. तिने जाताना जो आदर्श घालून दिला आहे, तो पाहून समाजातील इतर नागरिकांनीही नेत्रदानाचा संकल्प करावा आणि दृष्टीहीनांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करावा.
- भार्गव धारणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT