कोकण

‘सिंधुदुर्गनगरी’ आता महसुली गाव

CD

‘सिंधुदुर्गनगरी’ आता महसुली गाव

प्रशासनाची अधिसूचना; जिल्ह्यात एकूण संख्या ७५९

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः ओरोस बुद्रुक, अणाव आणि रानबांबुळी या गावांतील एकूण ३३४-२०-२० हेक्टर क्षेत्राचा समावेश करून ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसुली गाव निर्माण केले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्गमित केली असून उद्या (ता.१) पासून हे महसुली गाव अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुली गावांची एकूण संख्या ७५९ झाली आहे.
हे क्षेत्र संपादित करून २ एप्रिल १९९८ ला ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ची स्थापना केली होती. या प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राचाच नव्या महसुली गावात समावेश केला असून, त्याव्यतिरिक्त कोणतेही नवीन क्षेत्र या गावाच्या हद्दीत घेतलेले नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबतची अंतिम अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रानबांबुळी येथील ७७-३१ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित असले तरी त्याचे भूसंपादन झाले नसल्याने ते क्षेत्र मूळ गावातच कायम राहणार असून, नव्याने निर्माण झालेल्या ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गावात त्याचा समावेश नाही. ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गावाची निर्मिती आणि त्याच क्षेत्रातील प्रस्तावित सिंधुदुर्गनगरी नगरपरिषदेची निर्मिती या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओरोस बुद्रुक, अणाव, रानबांबुळी तसेच लगतच्या इतर गावांच्या क्षेत्रात कोणताही बदल होणार नाही. ओरोस बुद्रुक, अणाव आणि रानबांबुळी या गावांतील ३८-ब, २६७-ब व १-ब या सर्वे क्रमांकांचा समावेश करून नवीन महसुली गाव निर्माण केले आहे. यामुळे प्राधिकरण क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागामार्फत मिळणाऱ्या विविध दाखल्यांच्या प्रक्रियेत सुलभता येणार असून, त्याचा थेट लाभ स्थानिक जनतेला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT