कोकण

सुकळवाड केंद्रशाळेत सीसीटीव्हीचे लोकार्पण

CD

14883

सुकळवाड केंद्रशाळेत
सीसीटीव्हीचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरक्षितता आणि नियंत्रण राखण्यासाठी उद्योजक केशव भिसे यांच्या सहकार्यातून आणि लोकसहभागातून ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या प्रणालीचा लोकार्पण सोहळा बुधवारी (ता. ३१) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. भिसे यांच्या हस्ते फीत कापून या सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल वाळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाताडे, मुख्याध्यापक श्री. नांदोसकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, समिती सदस्य प्रकाश पावसकर, प्रसाद मोरजकर, शिक्षक श्री. बाचीपळे, अंगणवाडी सेविका धनश्री पडते, ग्रामस्थ पंढरी पाताडे, प्रवीण मोरजकर, ग्रामरोजगार सहायक प्रदीप पाताडे, अंगणवाडी मदतनीस दीपाली पेडणेकर, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे आदी उपस्थित होते. या उपाययोजनेमुळे संपूर्ण शाळा परिसर आता निगराणी कक्षेत आल्याने उपस्थित सर्व मान्यवरांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले. उद्योजक भिसे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT