कोकण

एकपात्री अभिनय स्पर्धा

CD

बसणी पंचक्रोशी ग्रंथालयतर्फे
११ला एकपात्री अभिनय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ः तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ११ जानेवारीला तालुकास्तरीय एकपात्री अभियनय स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे.
बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे १९९१ पासून एकपात्री अभिनय स्पर्धेचे गेली तीन वर्षे ही स्पर्धा कै. श्रीधर कृष्णा पेटकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना कोणत्याही नाटकातील एकांकिकेतील अथवा स्वलिखित उताऱ्यातील भाग सादर करता येईल. सादरीकरणासाठी कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात मिनिटांचा वेळ देण्यात येईल. ही स्पर्धा रविवारी सकाळी १० वा. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहात सुरू होईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १५०० रुपयांचे रोख पारितोषिक, द्वितीय १३०० रुपये, तृतीय ११०० रुपये तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी ५०० रुपये तसेच सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत होणार 'असे' बदल; आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

माणूस एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाला? 'माया' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : जालन्यातील वडीगोद्री येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद

Credit Card Alert: स्वाइप करण्याआधी थांबा! क्रेडिट कार्ड वापरताना होऊ शकतात 'हे' ५ मोठे आर्थिक तोटे; आत्ताच जाणून घ्या

Pune News : लोहगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांना उलट्या, जुलाबाचा त्रास; दूषित पाण्यामुळे संसर्ग झाल्‍याची शक्‍यता

SCROLL FOR NEXT