कोकण

एसटीचे प्राणांतिक अपघात घटले

CD

rat१p२०.jpg-
P२६O१४८९३
रत्नागिरी : एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
---
एसटीचे प्राणांतिक अपघात घटले
प्रज्ञेश बोरसे ः सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशिक्षण
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात सरत्या वर्षात प्राणांतिक अपघात घटले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये नऊ प्राणांतिक अपघात झाले होते. २०२५ मध्ये या अपघातांची संख्या २ने घटली; मात्र याच वर्षात किरकोळ अपघात वाढले आहेत तसेच गंभीर अपघातही वाढले आहेत. नव्या वर्षात अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.
बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अपघात टाळण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. सेवापूर्व प्रशिक्षण ४८ दिवस, उजळणी प्रशिक्षण दिले जाते. ज्या चालकांच्या हातून अपघात झाला आहे अशा चालकांना तत्काळ ११ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. शिवशाही चालकांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षेच्यादृष्टीने चालकांची वैद्यकीय व नेत्रतपासणी केली जाते. ४० वर्षाच्या आतील चालकांची २ वर्षांतून एकदा व ४० वर्षावरील चालकांची दरवर्षी तपासणी केली जाते तसेच मानसिकता बदल शिबिरे जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने केली जातात. मद्यप्राशन करून चालकाच्या हातून अपघात होऊ नये यासाठी अल्कोटेस्ट मशिन प्रत्येक आगाराला देण्यात आले आहे.
रत्नागिरी विभागात ७११ वेळापत्रकानुसार प्रतिदिन २ लाख २७ हजार ३२३ किमीची वाहतूक व शहरी वाहतुकीत २४ वेळापत्रकांनुसार ५२५८ किमी वाहतूक केली जाते. सुरक्षित वाहतुकीसाठी चालकांना सूचना दिल्या जात असल्याचे बोरसे यांनी सांगितले.
-------
चौकट
अपघाताची आकडेवारी
२०२४मध्ये शिवशाहीचे किरकोळ, गंभीर, प्राणांतिक मिळून एकूण १७ अपघात झाले व साध्या गाडीचे अपघात १५६ झाले. २०२५ मध्ये ही संख्या घटून ५ वर आली आणि साध्या गाडीचे अपघात १७७ झाले. म्हणजे साध्या गाडीचे अपघात २१ ने वाढले आहेत.
-------
चौकट
वर्ष* किरकोळ* गंभीर* प्राणांतिक* एकूण
२०२४* ९६* ९६* ९* १७३
२०२५* ७६* ९९* ७* १८२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT