- rat१p२.jpg
२६O१४८३२
ः रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप येथील उमंग साळवी यांच्या हापूस आंबाबागेमध्ये पाहणी करताना ठाणे विभागीय सहसंचालक शिवाजीराव आमले. सोबत कृषी विभागाचे अधिकारी.
----
आंबाबागेत ‘क्रायसोपा’ मित्रकिडीचा प्रयोग यशस्वी
कृषी विभाग; गोळप येथील आंबा फूलकीड नियंत्रण प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी आंबाबागेत ‘क्रायसोपा’ मित्रकिडीचा प्रयोग करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे. भाट्ये संशोधन केंद्रातील प्रयोगशाळेत तयार केलेल्या प्रौढ क्रायसोपा कीटक आणि त्यांची अंडी प्रत्यक्ष आंबाबागेत सोडण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील प्रगतशील शेतकरी उमंग साळवी यांच्या आंबाबागेत राबवण्यात येत असलेल्या ‘आंबा फूलकीड नियंत्रण पतदर्शी प्रकल्पा’ला ठाणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजीराव आमले यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी बागेतील प्रयोगांची पाहणी करून महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. या भेटीदरम्यान कृषी सहसंचालक आमले यांनी उपस्थित शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने आंबापिकावरील फूलकीड आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर, बायोपेस्टिसाइड्स (जैविक कीटकनाशके), खत व्यवस्थापन आणि लागवडीचा खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल, या विषयांवर मार्गदर्शन केले.
भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी या वेळी ‘क्रायसोपा’ या मित्रकिडीबद्दल उपस्थितांना सखोल माहिती दिली. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण कसे करता येते हे त्यांनी समजावून सांगितले. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रयोगशाळेत तयार केलेले प्रौढ क्रायसोपा कीटक आणि त्यांची अंडी या वेळी प्रत्यक्ष आंबाबागेत सोडण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, मंडल कृषी अधिकारी विकास मेढे (रत्नागिरी), सागर मासाळ (पावस), प्रदीप भुवड (मालगुंड) यांच्यासह उपकृषी अधिकारी घनश्याम कोकणी, ज्ञानेश्वर राऊत आणि कृषीसेवक दीपाली साळुंखे उपस्थित होत्या. या वेळी स्थानिक शेतकरी उमंग साळवी, उपेंद्र जोशी, गिरीश जोशी यांनीही चर्चेत सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे परिसरात जैविक कीड नियंत्रणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
------
कोट १
जैविक कीड नियंत्रणासाठी आंबा टास्क फोर्सअंतर्गत फूलकीड नियंत्रण आणि मोहोर सर्वेक्षण पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. त्यात गोळप येथील बागायतदारांची निवड झाली आहे. मित्रकिडींच्या वापराचा फायदा कसा होतो, हे या प्रयोगातून दाखवले जात आहे. त्यासाठी क्रायसोपा मित्रकिडीचा प्रयोग करण्यात आला आहे.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
-----
कोट २
आंबापिकावरील रस शोषणाऱ्या किडींवर जैविक पद्धतीने नियंत्रण होते. त्यामुळे औषधांची फवारणी करण्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. यासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे.
- ज्ञानेश्वर राऊत, कृषी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.