कोकण

बालनाट्य स्पर्धा सोमवारपासून

CD

कोल्हापूर, रत्ना-सिंधूसाठी

लोगो- मुखवटे

कोल्हापुरात राज्य बालनाट्य स्पर्धा
सोमवारपासून प्रारंभ ः कोल्हापूर - सांगली विभागीय केंद्रात एकूण ५० बालनाट्ये
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवार (ता. ५) पासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील विविध दहा केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कोल्हापूर विभागातील बालनाट्ये सादर होणार आहेत. कोल्हापूरसह कोकणातील २६ बालनाट्यांचा यात समावेश आहे. सांगली येथे तेरा जानेवारीपासून होणाऱ्या स्पर्धेत २४ बालनाट्ये सादर होतील. दरम्यान, दहा जानेवारीपर्यंत होणाऱ्या स्पर्धेसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असेल.

स्पर्धेचे वेळापत्रक असे...
सोमवार (ता. ५) ः बालपण हरवले रे देवा (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), झेप (ग्रीन व्हॅली स्कूल, पेठवडगाव), मनातल्या भुतांची ऐशीतैशी (आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ), बीज अंकुरले (कुडाळ हायस्कूल), उंदीर मामाची जादूई दुनिया (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ), पक्ष्यांचे कविसंमेलन (बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ).
मंगळवार (ता. ६) ः चेटकिणीच्या बंगल्यात (अलंकार कला अकादमी), ऐलमा पैलमा गणेश देवा (स्पर्श फाऊंडेशन), आमची काय चूक (नाट्यशुभांगी, जयसिंगपूर), व्हॉटस्‌ ॲपचा तमाशा (प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर), अथांग (श्रीरामवरदायिणी विद्यालय, चिपळूण), ठोंब्या (अभिरुची).
बुधवार (ता. ७) ः दोन ऑक्टोबरचे भाषण (येरंडोल स्कूल), सर तुम्ही गुरुजी व्हा (आजरा हायस्कूल), दुर्गा (पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा), काही क्षण (प्रायोगिक थिएटर्स, रत्नागिरी), खेळातील गेम (ग्रीन व्हॅली स्कूल, पेठवडगाव), दोन फुले (गुरुकुल प्राथमिक विद्यालय, पेठवडगाव).
गुरुवार (ता. ८) ः मायेची ऊब (पोफळी, चिपळूण), व्हॉटस्‌ ॲपचा तमाशा (श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण).
शुक्रवार (ता. ९) ः बीज अंकुरले (गडहिंग्लज कला अकादमी), कुपीतील गुपित (कन्या विद्यामंदिर, पोर्ले), धोंड (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी).
शनिवार (ता. १०) ः वारी (साई नाट्यधारा, हलकर्णी), काय ते जुनं (दामले विद्यालय, रत्नागिरी), लगोरी (यूथ फोरम, देवगड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT