- rat१p१८.jpg-
P२६O१४८६६
राजापूर ः सायबाच्या धरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे. यावेळी डावीकडून अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे, ठेकेदार गदगू जाधव आदी.
----
कोदवली धरणाचे काम अंतिम टप्प्यात
नगराध्यक्ष खलिफेंकडून पाहणी ; कामात गुणवत्ता अन् वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः तालुक्यातील कोदवली येथील ब्रिटिशकालीन सायबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्याने धरण बांधण्यात येत असून, या धरणाच्या कामाची नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी पाहणी केली. राजापूरवासियांना बारमाही मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे काम वेळेत पूर्ण करा आणि कामात गुणवत्ता राखा, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनासह ठेकेदाराला केल्या आहेत तसेच या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष खलिफे यांच्यासह राजापूर नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे, ठेकेदार गदगू जाधव आदी उपस्थित होते. सुमारे १४७ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी कोदवली येथे बांधलेल्या सायबाचे धरण राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत राहिलेला आहे. या धरणावरून विजेशिवाय अखंडितपणे राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. नादुरुस्त धरण, जीर्णावस्थेमुळे ठिकठिकाणी फुटलेली जलवाहिनी आणि साचलेला गाळ यामुळे धरणातून पाणीपुरवठा होण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शहराचा होणारा विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. धरणाच्या झालेल्या कामाची नगराध्यक्ष खलिफे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी सद्यःस्थितीमध्ये धरणाच्या झालेल्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला. तर, धरणाच्या उर्वरित राहिलेल्या कामापैकी १७ गेटचे काम, एम-३० काँक्रिटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकणे, धरणावर जाण्यासाठी काँक्रिट रस्ता, विद्युतीकरण करणे आदी कामांच्या अनुषंगाने पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. धरणाचे शिल्लक राहिलेले काम वेळेमध्ये पूर्ण होताना कामाची योग्य प्रकारची गुणवत्ता राखण्याची सूचनाही त्यांनी प्रशासन आणि ठेकेदार यांना केली. नव्या कोदवली धरणाचे काम पूर्ण होऊन त्या धरणामध्ये पाणीसाठा झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून राजापूर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
------
चौकट
सायबाचे नवीन धरण
लांबी ः ५० मीटर
उंची ः ६.४८ मीटर
भिंत रुंदी ः १० मीटर
झडपे वा गाळे ः १७
माथा उंची ः ९७ मीटर
अंदाजपत्रक ः सुमारे दहा कोटी रुपये
संभाव्य पाणीसाठा ः १०३ सहस्र घनमीटर
पाण्याची पाईपलाईन ः १४ इंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.