फोटो
KOP26O15098
संकटाच्या क्षणी १०८ रुग्णवाहिकेचा आधार
आपत्कालीन वैद्यकीय सेवा; जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका, अडीच लाख रुग्णांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचून तातडीचे उपचार मिळवून देणाऱ्या १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेने जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांत २ लाख ४८ हजार ८५९ लोकांचे प्राण वाचवले आहेत. खऱ्या अर्थाने ही सेवा रुग्णांसाठी लाइफलाइन ठरत आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १७ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. ही सेवा दरदिवशी सुमारे ६२ रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.
१०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचवणारी आपत्कालीन सेवा आहे. विशेषत: गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून ही सेवा २४ तास कार्य करत आहे. १०८ रुग्णवाहिका गरजूंना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणांनी सुसज्ज आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाली. या सेवेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत २४ हजार १६ रुग्णांचे प्राण वाचवले. यात सर्वाधिक १९ हजार ७१७ कॉल वैद्यकीय कारणासाठी होते. ११ वर्षांत ही सेवा तब्बल २ लाख ४८ हजार ८५९ रुग्णांसाठी लाइफलाइन ठरली तर ४९९ बालकांचा याच रुग्णवाहिकांमध्ये जन्म झाला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचाराची गरज असते. अशावेळी १०८ रुग्णवाहिका माहिती मिळताच घटनास्थळी जावून रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देते. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
---
चौकट
अविरत सेवेमुळे रुग्णांना संजीवनी
विविध प्रकारचे आघात ते हृदयविकाराच्या घटनांमधील हॉस्पिटलमध्ये नेताना रुग्णांना अतिदक्षता, खबरदारी घेतली जाते. जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवरील वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका चालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेमुळे रुग्णांना संजीवनी मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.