कोकण

''खनिजांच्या विश्वात'' शैक्षणिक प्रदर्शन चिपळूणमध्ये

CD

खनिजांच्या विश्वात’ शैक्षणिक प्रदर्शन
‘घरडा इन्स्टिट्यूट’मध्ये, आजपासून आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यावतीने ‘खनिजांच्या विश्वात’ या संकल्पनेवर आधारित भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्यापासून (ता. ३) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन घरडा वाचनालयात सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आणि ४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
‘दगडात दडलेले विज्ञान समजून घ्या…’ या विचारावर आधारित हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक व अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खनिजांचे प्रकार, त्यांची निर्मिती प्रक्रिया, त्यांचे औद्योगिक व दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच भौगोलिक दृष्टिकोनातून असलेले महत्त्व या विषयी सविस्तर माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची खनिजे तसेच दगडांचे आकर्षक आणि अभ्यासपूर्ण नमुने नागरिकांच्या पाहणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील तसेच स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. वाय. आर. कुळकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT