कोकण

मुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर

CD

kan23.jpg
15071

मुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर
डॉ.निर्मोही फडके, निशिगंधा गावकर, मनीषा शिरटावले यांना पुरस्कार : सिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण, विद्या पाटील यांचाही गौरव होणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ : मुंबई एकता कल्चर अकादमीच्या वार्षिक साहित्य पुरस्कार योजनेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ठाणे येथील कवयित्री डॉ. निर्मोही फडके यांना एकता कल्चर काव्य पुरस्कार, कणकवली येथील कवयित्री निशिगंधा गावकर यांना समता काव्य पुरस्कार आणि सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांना रमाई माता काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दरम्यान याच कार्यक्रमात कवितेसाठी सिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण आणि विद्या पाटील यांनाही गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य ज्येष्ठ हिंदी अनुवादक डॉ. रमेश यादव यांनी या पुरस्कार योजनेचे परीक्षण केले असल्याची माहिती एकता कल्चरचे अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली.
मुंबई एकता कल्चर अकादमी साहित्य आणि कलाक्षेत्र विविध स्पर्धांचे आयोजन करते या स्पर्धांना राज्यभरातून अनेक गुणवंत साहित्यिक आणि इतर कला क्षेत्रातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या या काव्य पुरस्कार योजनेसाठी महाराष्ट्रातून ६५ कवींनी आपल्या कविता पाठवून प्रतिसाद दिला. यातून डॉ. निर्मोही फडके, निशिगंधा गावकर आणि मनीषा शिरटावले यांच्या कविता पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या.
उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी एकूण ९ कवींच्या कविता निवडण्यात आल्या असून यात विद्या पाटील - सिंधुदुर्ग, किरण माने- कोल्हापूर, मकरंद हळदणकर- मुंबई, मिलन कांबळे - मुंबई, आरती धारप- रोहा, दीपक करंगुडकर - भायखळा, संचिता चव्हाण- बोरवली, श्रीपाद टेंबे- पुणे, स्नेहल रावराणे- सिंधुदुर्ग आदी कवींचा समावेश आहे. या काव्य पुरस्काराचे पारितोषिक वितरण १० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे एकता कल्चरच्या वार्षिक कार्यक्रमात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT