कोकण

तळवडेच्या विकासाठी कटीबध्द

CD

swt23.jpg
15090
तळवडे ः भाऊचा धक्का ते बादेवाडी रस्ता कामाचे भूमिपूजन करताना मनिष दळवी. सोबत इतर मान्यवर व ग्रामस्थ.

तळवडेच्या विकासाठी कटीबध्द
मनिष दळवीः तीन रस्ता कामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिले. तळवडे गावातील ३१ लाख रुपये निधीच्या तीन महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन दळवी यांच्या हस्ते झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
​या निधीतून भवानी मंदिर ते मांजरेकर वाडी (१४ लाख), भाऊचा धक्का ते लोकेवाडी (७ लाख) आणि भाऊचा धक्का ते बादेवाडी (१० लाख) या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे गावातील वाड्यावस्त्या मुख्य प्रवाहात जोडल्या जाऊन दळणवळण सोपे होणार आहे. ​या भूमिपूजन सोहळ्याला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष परब, तळवडे शक्ती केंद्रप्रमुख शंकर सावंत, आंबोली मंडळ सरचिटणीस दादा परब, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मांजरेकर, मंगलदास पेडणेकर, नम्रता गावडे, विकास गावडे, सुशांत गावडे, प्रवीण लोके, बाळू साळगावकर, रामा गावडे, दाजी तुळसकर, सुदन मांजरेकर, पोलीस पाटील मयुरी राऊळ, झिला वेंगुर्लेकर आणि विनय काणेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित रस्त्यांचे काम सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मनीष दळवी व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT