कोकण

साखरपा-विवेक गुरूपादगोळची बाईकवरून नेपाळ राईड

CD

rat2p10.jpg
15095
विवेक गुरूपादगोळ
-----------
विवेक गुरूपादगोळची दुचाकीने नेपाळ राईड
साखरपा ते नेपाळ ; ५ हजार ४०० किमीचा प्रवास दहा दिवसात
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २ : जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे साखरपा येथील एका तरुणाने स्वतःच्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. विवेक गुरूपादगोळ यांनी दुचाकीवरून साखरपा ते थेट नेपाळ असा प्रवास केला आहे आणि तोही केवळ १० दिवसात.
लाँगड्राईव्ह हे शब्द आपण केवळ वापरतो; पण ही ड्राईव्ह किती लाँग असू शकते हे विवेक यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. त्यांना दुचाकीचे वेड लहानपणापासून आहे. त्यांनी यापूर्वीही असाच प्रवास दुचाकीवरून अरूणाचल प्रदेश, लेहलडाख, सिक्कीम, कन्याकुमारी हे दौरे पूर्ण केले आहेत. नेपाळचा प्रवास त्यांनी १२ जानेवारीला सुरू केला. साखरपा ते मुंबई, तिथून इंदौर, कानपूर, नेपाळ, बुटवल असा प्रवास करत २४ डिसेंबरला ते साखरपा येथे परत आले. रोज सकाळी पाच ते संध्याकाळी सात या वेळेत रोज सरासरी ७०० किलोमीटरचे अंतर प्रवास करत होते. या सगळ्या प्रवासात त्यांना जयदीप नाळे या त्यांच्या कोल्हापूरच्या मित्राने साथ दिली. ते साखरपा गावात किराणा व्यवसाय सांभाळतात. आपल्या व्यवसायातून वर्षातून एकदा ते आपला हा छंद सांभाळतात. यापुढे हिमाचल प्रदेश येथील स्पिती या ठिकाणी जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भांडुपमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT