‘सैनिक कल्याण’
संघटकांचे दौरे
रत्नागिरी : माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे जानेवारीमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळवले आहे. ५ जानेवारीला खेड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि ६ ला चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक राहुल काटे येणार आहेत. १२ ला खेड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि १३ ला चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे यांचा दौरा असेल. १९ ला खेड आणि २०ला चिपळूण येथे काटे दौऱ्यावर येणार आहेत. २७ ला खेड आणि २८ ला चिपळूण येथे संघटक सुनील कदम दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शनविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडवण्यात येतील.
--------
बालमहोत्सवाचे
मंगळवारी उद्घाटन
रत्नागिरीः बालकांसाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन ६ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे सकाळी १० वा. होणार आहे. जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभागातील शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी, मुलांमधील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधूभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बालमहोत्सवामध्ये ८ अशासकीय बालगृहातील बालके, रत्नागिरी नगरपालिका शाळेमधील बालके अशी एकूण ५०० बालके सहभागी होणार आहेत. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा, सामूहिक नृत्य, गायन, नाटिका, वैयक्तिक नृत्य, गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा ६ ते ८ जानेवारी या कालावधीत होणार आहे.
---------
टपाल विभागाची
२७ ला पेन्शन अदालत
रत्नागिरी ः टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी/कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी गोवा येथील पणजी येथे २७ जानेवारीला दुपारी ३ वा. पेन्शन अदालत होणार आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारींचे निवारण झालेले नाही, अशा प्रकरणाचा विचार करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.