कोकण

एकीचे बळ, जलसंधारणाचे फळ

CD

15149

एकीचे बळ, जलसंधारणाचे फळ

खांबाळेत लोकसहभागातून दोन वनराई बंधारे

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः खांबाळे येथील ढोम्याचा व्हाळावर लोकसहभागातून दोन वनराई बंधारे उभारण्यात आले. यासाठी गावातील शेकडो ग्रामस्थांनी श्रमदान केले. या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने ढोम्याच्या व्हाळावर दोन वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. गावातील शेकडो ग्रामस्थ एकवटले आणि बंधारा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी सुरू झालेले काम दुपारी एकवाजेपर्यंत सुरू होते. बंधारा उभारणीनंतर दोन तासांत बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला. याची गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच प्राजक्ता कदम, माजी पंचायत उपसरपंच मंगेश गुरव, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, माजी सरपंच मंगेश कदम, प्रवीण गायकवाड, गणेश पवार, लवू पवार, विठोबा सुतार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण, प्रमोद लोके, महेश चव्हाण, सुनील पवार, संकेश पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT