कोकण

हक्क ओळखा, फसवणूक टाळा!

CD

15333

हक्क ओळखा, फसवणूक टाळा!

मालवण-भरड येथे ग्राहकदिनी जनजागृती

मालवण, ता. ३ ः भरड येथील लिलांजली हॉल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क आणि कायदेशीर संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि ग्राहक चळवळीचे प्रणेते तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रमाकांत वाक्कर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालवण शाखा अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, जिल्हा ग्राहक समिती सह संघटक प्रमोद मोहिते, ॲड. प्राजक्ता गावकर व ॲड. सुमित जाधव, पुरवठा निरीक्षक विशाल कापसे, निरीक्षण अधिकारी शिला निकस, डॉ. सुभाष दिघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ॲड. प्राजक्ता गावकर आणि ॲड. सुमित जाधव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. वस्तू खरेदी करताना घ्यायची खबरदारी आणि फसवणूक झाल्यास दाद कशी मागावी, यावर त्यांनी प्रकाश टाकला. तहसीलदार गणेश लव्हे यांनी ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT