‘निराधार’च्या २० प्रकरणांना
वैभववाडीतील सभेत मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ः संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार, अपंग, विधवा व अनाथ अशा एकूण २० लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
नूतन अध्यक्ष अनंत फोंडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिलीच बैठक ठरली. यावेळी तहसीलदार सुर्यकांत पाटील, सचिन निकम, दिलीप पाटील, अभय कांबळे, नवलराज काळे, गणेश पवार, बाळकृष्ण वाडेकर, सिद्धेश रावराणे, परशुराम इस्वलकर आदी सदस्य उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अपंग-अस्थिव्यंग, मतिमंद, अंध, विधवा निराधार व अनाथ अशा एकूण १८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
यामध्ये नागेश आम्रसकर, दीपक साळवी, सुभाष साळुंखे, दर्शना किंजवडेकर, दत्ताराम इंदुलकर, रेश्मा सुतार, दर्वेश पाटणकर, दीपक सुतार, स्नेहल गोठणकर, रोहित फोंडके, रुक्सार बोबडे, राज बिले, प्रतिभा नाथगोसावी, सुप्रिया सावंत, स्वप्निल बोडेकर, रज्जाक नंदकर, संजना परब व श्रवण सहदेव रावराणे यांचा समावेश आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत कृष्णा भोसले व वनिता चव्हाण यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा २,५०० रुपये, तर श्रावणबाळ योजनेतर्गत १,५०० रुपये अनुदान दिले जाते. शासनाने निराधार, अपंग, अनाथ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली असून, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी संपूर्ण प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष फोंडके यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.