कोकण

ज्येष्ठांशी संवादातूनच आई-वडिलांनाच भेटलो

CD

-rat२p११.jpg-
२६O१५१००
लांजा ः ज्येष्ठ नागरिकांसोबत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे आदी.
----
आई-वडिलांची उणीव भरून निघाली
नितीन बगाटे ः वेरळमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांना व्यस्त कामामुळे भेटता येत नाही, याची मनाला हुरहूर लागत होती. रत्नागिरी जिल्ह्यात मिशन जीवनअंतर्गत विविध उपक्रमामार्फत मला माझ्या या आई-वडिलांना भेटण्याचे आणि गप्पा मारण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मिशन जीवनअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या नेतृत्वाखाली वेरळ येथील मराठी शाळेत हा सोहळा झाला. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी, तहसीलदार प्रियांका ढोले, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, सरपंच सुवर्णा जाधव आदी, मुख्याध्यापक संदीप कदम, पोलिस पाटील यदुनाथ पंडित उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांचे नातवंडांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले. त्यानंतर एकाचवेळी सुमारे १२५ ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. या प्रसंगी बगाटे म्हणाले, आपण हा उपक्रम जोरदार उत्साहात करून ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील दुरावा कमी करण्याचा या मिशनद्वारे प्रयत्न आहे. या प्रसंगी पाच ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा तर वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवढ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत 'महिलाराज'! स्थायी समितीच्या १६ पैकी ११ जागांवर महिलांची वर्णी

Latest Marathi News Live Update : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृतीत अचानक बिघाड

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT