कोकण

रत्नागिरी तालुक्यात बिबट्याची दहशत

CD

रत्नागिरी तालुक्यात बिबट्याची दहशत
शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण; ट्रॅप कॅमेरे लावणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. दरदिवशी कुठेना कुठे मानवीवस्तीमध्ये बिबट्याचा संचार असल्याचे दिसत आहे. दोन बछड्यांसह पाडावेवाडी येथे काहींना बिबट्याचे दर्शन झाले. त्यात तेथील कुत्र्याची शिकार बिबट्याने केल्याने मिरजोळे पाडावेवाडी, सोनारवाडी आदी भागांत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री बाहेर पडणे किंवा दिवसा शेतावर जाण्यास नागरिक धजावत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वन विभागाने याची दखल घेतली असून, तेथे ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. निरूळ, मिरजोळे, सोमेश्वर, पाटीलवाडी, मिऱ्या आदी भागांत बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे ते भक्ष्य पकडण्यासाठी मानवीवस्तीमध्ये येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ले यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. येथील सोनारवाडी भागात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना मागील महिन्यात उघडकीस आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वाडीतून एका घराजवळ बांधलेल्या कुत्र्याची शिकार केली. आता पाडावेवाडीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दोन बछड्यांसह दर्शन झाल्याने ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.
गुरववाडीतही यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती असून, वन विभागाने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यानंतर पाडावेवाडीतील दत्ताराम पाडावे यांच्या घराच्या बाजूला अंगणात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या कुत्र्याला ५ दिवसांपूर्वी मानेचा चावा घेऊन बिबट्या पसार झाला होता; मात्र मंगळवारी रात्री येऊन त्या कुत्र्याला बिबट्याने ओढून रानात नेऊन ठार मारले. या प्रकारानंतर पाडावेवाडीजवळच बागेत निघालेल्या राजेश कोलगे यांना दोन बछड्यांसह बिबट्या दिसल्याने कोलगे व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मुलाची भीतीने गाळण उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT