कोकण

मोटार-दुचाकीच्या धडकेत स्वार गंभीर जखमी

CD

मोटार-दुचाकीचा अपघात
दापोली-हर्णै रस्त्यावरील घटना ; स्वार गंभीर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ ः दापोली-हर्णै मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १) रात्री दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक सुदर्शन बहिरे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मोटार आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी रस्त्याच्या एका बाजूला शाळेची बस तर दुसऱ्या बाजूला फूडव्हॅन उभी राहत असल्याने रस्ता अरुंद होतो. यामुळे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच ठिकाणी तहसील कार्यालयासमोर अर्धवट अवस्थेत टाकलेला गतिरोधक अपघातांचे कारण ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे गतिरोधक अर्धवट टाकल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो व अपघात होतो. अपघाताची माहिती मिळताच पोलिस यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT