कोकण

-कोकण रेल्वेमार्गावर चोऱ्यांना आळा

CD

-rat२p२१.jpg-
२६O१५१९०
खेड ः कोकण रेल्वेमार्गावर २४ तास तैनात असलेले गृहरक्षक दलाचे जवान.
---
खेडसह कोकण मार्गावर कडक सुरक्षा
गृहरक्षक दलाचे जवान २४ तास तैनात; प्रवाशांनाही मदत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेगाड्यांमधील चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वेस्थानकांवर गृहरक्षक दलाचे जवान २४ तास कर्तव्य बजावत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मध्यरात्री क्रॉसिंगसाठी गाड्या थांबलेल्या असताना झोपेत असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पळ काढत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खेडसह कळंबणी बुद्रुक, नातूनगर आदी रेल्वेस्थानकांवर चोऱ्या रोखण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थानक परिसरासह रेल्वेगाड्यांमध्येही ते करडी नजर ठेवून आहेत याशिवाय गर्दीच्यावेळी प्रवाशांना सुरक्षितपणे रेल्वेत प्रवेश मिळावा यासाठी गृहरक्षक दलाचे जवान पुढाकार घेत सहकार्य करत आहेत. अनेकवेळा प्रवासी दरवाजात उभे राहून किंवा लोंबकळत प्रवास करत असल्याने अपघाताची शक्यताही असते. त्यामुळे शिस्त राखणे आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे यासाठी गृहरक्षक दलाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या उपक्रमाचे प्रवासीवर्गातून स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT