कोकण

पाककला स्पर्धेत तेजश्री शेंगाळे प्रथम

CD

15262

पाककला स्पर्धेत तेजश्री शेंगाळे प्रथम

खारेपाटण महाविद्यालयात विविध ‘कल्चरल डेज’

तळेरे, ता. ३ : खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला विभाग कक्ष, मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध ‘कल्चरल डेज’ उत्साहात साजरे करण्यात आले. याअंतर्गत आयोजित पाककला स्पर्धेत वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी तेजश्री सुहास शेंगाळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पदार्थांचे आकर्षक सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा : तेजश्री शेंगाळे (वाणिज्य), हलिमा सारंग (विज्ञान), सलोनी जाधव (विज्ञान), उत्तेजनार्थ : हर्षदा बामणेकर (कला). सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत साजऱ्या करण्यात आलेल्या विविध ट्रॅडिशनल डे बरोबरच विद्यार्थिनींच्या ‘सारी डे’ साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी देसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. माधवी पांचाळ यांनी केले. पाककला स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. वंदना शिंदे (कला), प्रा. नमिरा मुजावर (वाणिज्य) व प्रा. प्रज्योत नलावडे (विज्ञान विभाग) यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT