कोकण

सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांची शैक्षणिक बांधिलकी

CD

rat३p१.jpg-
२६O१५२८१
रत्नागिरी- सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांनी जिल्हा परिषद शाळांना टीव्ही व प्रिंटर दिला.
-----
सैतवडेतील शाळांना डिजिटल आधार
सरपंच साजिद शेकासन यांच्याकडून टीव्ही, प्रिंटर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : तालुक्यातील सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांनी नुकतेच जिल्हा परिषद शाळा नं. १ व २ तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला भरीव सहकार्य केले. जिल्हा परिषद शाळा नं. १ ला ग्रामपंचायतीच्यावतीने टीव्ही व स्वखर्चाने प्रिंटर दिला. आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला ग्रामपंचायतकडून लॅपटॉप व प्रिंटर स्वखर्चाने दिला.
या वेळी जिल्हा परिषद शाळा एकचे ज्ञानेश्वर ढाकणे, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार प्रक्षाळे, उपसरपंच सुवेश चव्हाण, शाळा नं. २च्या मुख्याध्यापिका स्नेहा जाधव, कानडे, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नियती कदम, मनोज सावंत, मोहन तांबे (आरोग्य सहाय्यक), प्राथमिक आरोग्यकेंद्र वाटदच्या धनश्री पावरी (समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र सैतवडे, आशासेविका प्रणाली पवार, सुजाता खापले, पूनम पवार आदी उपस्थित होते तसेच या दोन्ही शाळांना पाण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकीही प्रदान केली. या शैक्षणिक मदतीमुळे ऑनलाईनची कामे करणे सुलभ होणार आहेत. शैक्षणिक गरजांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याबरोबर प्रसंगी पदरमोड करून शाळांना भरीव सहकार्य केल्याबद्दल सरपंच साजिद शेकासन यांचे पालकवर्गातून तसेच शिक्षकांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या प्रमुख डॉ. श्रुती कदम यांनीही या विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी ६ कोटी रुपये, गौमत गंभीरला किती?

Latest Marathi News Live Update : इंधन वाहतूक सुरळीत,पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही

IPL 2026: वर्ल्ड कप विजेते २ कर्णधार, उपविजेता कर्णधार अन् फायनलमधील सामनावीर; Hardik Pandyaच्या नेतृत्वाखाली चार स्टार खेळणार

SCROLL FOR NEXT