कोकण

आंबोली केंद्रातील मुलींचा दबदबा

CD

15292

आंबोली केंद्रातील मुलींचा दबदबा

जिल्हास्तरीय ‘कबड्डी’साठी पात्र; प्राथमिक शिक्षक समितीकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आंबोली केंद्रातील आंबोली नांगरतास, आंबोली मुळवंद व गेळे-बाळेभाटले शाळांच्या एकत्रित संघाने कबड्डी लहान गट मुली या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्व खेळाडू व शाळांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी ‘अधिक उंच, अधिक जलद, अधिक गतिमान’ या ब्रीदवाक्याखाली शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा आंबोली केंद्रातील नांगरतास, गेळे-बाळेभाटले व मुळवंदवाडी या तीन शाळांनी मिळून तयार केलेल्या संघाने प्रथम प्रभागस्तरावर अव्वल क्रमांक मिळविला. तालुकास्तरावरही उत्कृष्ट खेळ दाखवत विजेतेपद पटकावले.
या संघातील प्रणाली जंगले, प्रणावी जंगले, सुजाता यमकर, तनुषा आवटे, श्रेया गुडूळकर, पूजा खरात, राजनंदिनी शिंदे, आन्वी हिरेमठ, रुंजी सावंत व ईश्वरी सावंत या विद्यार्थिनींचा अभिनंदनपत्र व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आंबोली नांगरतास, आंबोली मुळवंद व गेळे-बाळेभाटले शाळांतील शिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांच्या हस्ते सर्वांना गौरविण्यात आले. यंदा प्रथमच प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेची चॅम्पियनशिप आंबोली केंद्राने पटकावल्याबद्दल केंद्रप्रमुख व केंद्रातील सर्व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. कबड्डी संघाचे मार्गदर्शक सचिन कोकितकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद तांबोळी, केंद्र मुख्याध्यापक अनिता साबळे, गेळे शाळेचे मुख्याध्यापक अनंत राऊत, तालुका उपाध्यक्ष सुहास गावडे, कोषाध्यक्ष अवधूत जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या महत्त्वाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

SCROLL FOR NEXT