कोकण

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल

CD

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे
चिपळूण पोलिसांची कारवाई ; चौघांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कडक पावले उचलली. ३१ डिसेंबर २०२५ ला रात्री बहादूरशेख नाका परिसरात राबवण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान मद्यधुंदावस्थेत वाहन चालवणाऱ्या चार दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ डिसेंबरला रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मोटारवाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बहादूरशेख नाका येथे नाकाबंदीदरम्यान शैलेश सुरेश हिवाळकर (वय ३६, रा. खेर्डी) हा दुचाकी मद्य पिऊन चालवताना आढळून आला. या प्रकरणी पोलिस हवालदार पांडुरंग शिवराम जवरत यांनी फिर्याद दिली. दिनेश रामेश्वरसिंग (वय ३२, रा. खेर्डी) हा दुचाकी चालवत असताना मद्यधुंदावस्थेत सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन शिवाजी देशमुख यांनी फिर्याद दाखल केली. शेषांश कुमारसिंग (वय २७, रा. खेर्डी) हा दुचाकी मद्य पिऊन चालवताना मिळून आला. या घटनेत पोलिस हवालदार गणेश भागवत नाळे हे फिर्यादी आहेत. इंद्रजित हनमंतराव पवार (वय २९, रा. मलकापूर, कऱ्हाड) हा दुचाकी मद्यधुंदावस्थेत बहादूरशेख नाका येथे वाहन चालवताना पकडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन शिवाजी देशमुख यांनी फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : २५ वर्षांचा काळा हिशेब, ६,३८१ शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करा - असीम सरोदे

Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

Mumbai Election Polls : अपक्षांचे फुटले पेव! पालिका निवडणुकीसाठी तब्बल ५५१ उमेदवार

Kolhapur ST : 'फोन पे–गुगल पे' ने बदलली एसटीची सफर; प्रवासीही खूश, महसूलही वाढला

SCROLL FOR NEXT