कोकण

समस्या समजून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा

CD

rat३p४.jpg-
P२६O१५२८४
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरात कार्यअहवालाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर.
----
सेवेच्या वाटेवरून जीवनाचे धडे
डॉ. साखळकर ः गोगटेच्या एनएसएसचे शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : एनएसएस शिबिरातून स्वयंसेवकांनी विविध कौशल्ये आत्मसात केली आहेत. सामाजिक जीवनासाठी आवश्यक असलेली जाणीव त्यातून निर्माण झाली आहे. समस्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते, समस्या समजून घेणे, त्यांचे आकलन करणे व त्या कशा प्रकारे सोडवाव्यात हे शिबिरातून शिकायला मिळाले असून, त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे केळये येथील विशेष निवासी शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. सरपंच सौरवी पाचगुडे, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, नाखरेकर, माजी विद्यार्थी रामचंद्र केळकर, सुरेंद्र केळकर, चिन्मय पोळेकर आणि शिबिरार्थी उपस्थित होते.
सरपंच पाचकुडवे यांनी स्वयंसेवकांनी नदीवरील बंधाऱ्यासोबत नदीतील प्लास्टिक कचरा संकलित करून नदी स्वच्छ केल्याबद्दल विशेष आभार मानले. स्थानिकांना याचा खूप फायदा होईल. सोबत रस्ते स्वच्छता, प्लास्टिक संकलन, शिबिरातील प्रबोधन पथनाट्य यांचेही कौतुक केले.
शिबिरात सामाजिक जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आली. व्यसनमुक्ती, आरोग्य, शिक्षण, सोशल मीडिया, कौटुंबिक हिंसाचार हे पथनाट्य सादरीकरणाचे विषय होते. स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेऊन जनजागृती केली तसेच शिबिरात प्रा. उमा जोशी यांनी मंडल आर्ट कार्यशाळा घेतली. या सत्रामध्ये मंडल आर्टचे महत्त्व, त्याची रचना व रंगसंगती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंडल आर्टमुळे एकाग्रता वाढते त्यासोबतच मानसिक शांतता मिळते तसेच तणाव कमी होण्यास मदत होते, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.
---
चौकट
विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट लक्ष्यगीत- शारदा संघ, समूहगीत- सरस्वती संघ, सांस्कृतिक कार्यक्रम- सरस्वती संघ, पथनाट्य- सरस्वती संघ
संघ- सरस्वती संघ, मार्गदर्शक-आसिया अत्तरवाले, सिंधू संघ, नेतृत्व- शर्विल रांबाडे, ब्रह्मपुत्रा संघ, श्रमदान (स्वयंसेवक)-मानस कांबळे, सरस्वती संघ, श्रमदान (स्वयंसेविका)-अर्पिता इंजळे, सिंधू संघ, स्वयंसेवक-सार्थक डांगे, शारदा संघ, स्वयंसेविका-आर्या पळसुलेदेसाई, ब्रह्मपुत्रा संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Todays Weather Update : नागपूरकरांनी अनुभवली पाच वर्षांतील थंडगार रात्र; पारा प्रथमच ७.६ अंशांवर; विदर्भात आज कसं असेल तापमान?

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

SCROLL FOR NEXT