कोकण

समूहगीत, चित्रकला स्पर्धांना प्रतिसाद

CD

15308

समूहगीत, चित्रकला स्पर्धांना प्रतिसाद

आरोंदा प्रशालेचा उपक्रम; विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता.४ ः आरोंदा हायस्कूल व कला, वाणिज्य, उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय समूहगीत व चित्रकला स्पर्धा झाल्या. सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुके मर्यादित ही स्पर्धा आरोंदा गावचे सुपुत्र डॉ. पी. वाय. नाईक (ज्येष्ठ संशोधक) यांच्या पत्नी (कै.) पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूलच्यावतीने आयोजित करण्यात आली.
स्पर्धेचे उद्‍घाटन संस्थेचे उपाध्यक्ष बबन नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. चित्रकला स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटात घेण्यात आली, तर समूहगीत स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली. विजेत्यांसाठी अनुक्रमे ५०००, ३०००, २००० तसेच उत्तेजनार्थ १००० रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते.
चित्रकला स्पर्धेतील विजेते अनुक्रमे ः गट क्रमांक १ (पहिली ते चौथी)-प्रार्थना नाईक, सार्थक मालवणकर (दोन्ही स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव सावंतवाडी), रामनाथ मेस्त्री (मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी), उत्तेजनार्थ तन्मय बावकर (जिल्हा परिषद शाळा, साटेली तर्फ सातार्डा). गट क्रमांक दोन (पाचवी ते सातवी)-श्रीकृष्ण मोचेमाडकर (सेंट फ्रान्सिस स्कूल, आजगाव), रुद्रा गोसावी (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव), श्रीराज कारिवडेकर (मळगाव इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ करिष्मा परब (माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय दांडेली). गट क्रमांक तीन (आठवी ते दहावी)-वर्षा नाईक (जनता विद्यालय, तळवडे), रुद्रताली शिरोडकर (अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा), दिव्यांगी धर्णे (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), उत्तेजनार्थ सोहम कोरगावकर (आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी).
समूहगीत स्पर्धेतील विजेते ः लहान गट (पाचवी ते सातवी)-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कामळेवीर, जिल्हा परिषद शाळा उभादांडा क्र.१, सावंतवाडी नंबर ४, उत्तेजनार्थ प. पू. भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली क्र. ३, शाळा कांदुळी-कुडाळ. मोठा गट (आठवी ते दहावी)-श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, नेमळे पंचक्रोशी विद्यालय, तृतीय विभागून जनता विद्यालय तळवडे (सावंतवाडी) व ओझर विद्यामंदिर कांदळगाव (मालवण), उत्तेजनार्थ विद्याविहार स्कूल आजगाव व आरोंदा हायस्कूल. पारितोषिक वितरण मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, मंडळाचे अध्यक्ष संदेश परब, प्रमुख अतिथी डॉ. पी. वाय. नाईक, संस्था सचिव भाई देऊलकर, उपाध्यक्ष बबन नाईक, सहसचिव अशोक धर्णे, सदस्य रामचंद्र कोरगावकर, केदार रेगे, खजिनदार रुपेश धर्णे, स्नेहा गडेकर, आरोंदा सरपंच सायली साळगावकर, मनोहर आरोंदेकर, विद्याधर नाईक, ग्रामपंचायत सदस्य स्मिताली नाईक, नरेश देऊलकर आदी उपस्थित होते. परीक्षण नीलेश मेस्त्री, भावेश राणे, समीर चांदरकर व श्री. मालवणकर यांनी केले. पारितोषिक वितरण डॉ. नाईक, संदेश परब व मुख्याध्यापक तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षिका भावना माजगावकर, सुप्रिया कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. चंदन गोसावी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Gas Shortage : मुंबईच्या चुली विझल्या; गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स बंद, फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम

Gas Cylinder बूक केलाय? 'या' नंबरवर पाठवा 'हा' मेसेज; एका मिनिटात कळेल कधी होणार डिलिव्हरी, घरबसल्या मिळवा गॅस

The Nation Pays Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj on his Martydom Day: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातून श्रद्धांजली; अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Traffic Jam Viral Post : 23 KM नको, 47 KM च बरं! Google Map चा 'तो' स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी महिलेची भन्नाट आयडिया

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT