कोकण

सूर्यपूजेचे स्थान अत्यंत प्राचीन, मूलगामी

CD

26O15328
तळपत्या सूर्याचे दैवीत्व............. लोगो

सूर्यपूजेचे स्थान अत्यंत प्राचीन, मूलगामी

पाषाणयुगीन मानव हा निसर्गावर पूर्णतः अवलंबून होता. अशा समाजासाठी सूर्य हा फक्त प्रकाशाचा स्रोत नव्हता तर दिशा, कालगणना, ऋतूंची गती आणि शेतीचा आधार होता. त्यामुळे त्याच्याबाबत एक आदरयुक्त श्रद्धा आणि दैवीत्व विकसित होत गेलं. याचे प्रतिबिंब प्रागैतिहासिक काळापासून आपल्याला निसर्गपूजेतून दिसून येते. जिथे वीज, पाऊस, वारा यांच्यासह सूर्यालाही पूजनीय मानले जात असे. याचे प्रतिबिंब आपण विविध भित्तिचित्रांपासून ते आजच्या आधुनिक संक्रांतीपर्यंत अनुभवायला येते.
-rat3p13.jpg-
26O15315
- मिलनाथ पाथेरे, अभ्यासक
--
भारतीय उपखंडातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत सूर्यपूजेचे स्थान अत्यंत प्राचीन आणि मूलगामी आहे. सूर्य हा केवळ प्रकाश व उष्णतेचा स्रोत नसून, तो जीवनाचा चालक, अन्ननिर्मितीचा आधार, ऋतूंचा नियंता आणि कालगणनेचा मूलभूत घटक मानला गेला आहे. हा दृष्टिकोन केवळ आजच्या काळातला नसून हजारो वर्षांपूर्वीच्या प्रागैतिहासिक काळातही माणसाच्या आचरणात आणि श्रद्धेत दिसून आपल्याला पाहायला मिळतो. प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे मानवाच्या अशा जीवनाचा टप्पा जिथे लिखित अभिलेख उपलब्ध नाहीत. या काळातील सूर्यपूजेचा अभ्यास करताना जागतिक आणि भारतीय दोन्ही पातळ्यांवर भित्तीचित्रांमधून, दगडी शिल्पांमधून व पुरातत्त्वीय संरचनांतून मिळणाऱ्या पुराव्यांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरते.
*भित्तीचित्रांतून, शिल्पचित्रांतून तसेच स्तंभरचनातून सूर्यपूजेचे संकेत
मध्यप्रदेशातील भीमबेटका, राजस्थानमधील गिलुंड आणि कर्नाटकातील हुलीगल्ली येथे आढळलेली भित्तिचित्रे सूर्यपूजेच्या प्रारंभीच्या श्रद्धांचा पुरावा देतात. यामध्ये गोल व विकिरणधर्मी आकृती आढळतात, ज्या संशोधकांच्या मते सूर्याचे प्रतीक आहेत. ‘Radiating Circle’ (उत्सर्जित वर्तुळ) या नावाने ओळखले जाणारे हे चिन्ह मध्यप्रदेशातील मोदी (मंदसौर), भोपाळच्या गणेशघाटी आणि राईसेन जिल्ह्यातील चित्रांमध्ये दिसतात याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी गावातील कातळशिल्पांमध्येदेखील अशा सूर्यसदृश वर्तुळाकार चित्रांची नोंद आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहता ऑस्ट्रोनेशियन परंपरेच्या रॉक आर्ट्समधून देखील सूर्याची उपासना सूचित होते. पापुआच्या मिसूल बेटावरील लेण माकाना आणि सन मलेले इत्यादी ठिकाणी दगडांवर कोरलेली चित्रे सूर्य, मुखवटे आणि नौका या प्रतिमांद्वारे धार्मिक व सांस्कृतिक अर्थ सूचित करतात.
सूर्यपूजेच्या पुराव्यांमध्ये शिल्प आणि वास्तुयोजनादेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, मेघालयातील नोंगख्लाव आणि माव-फ्लांग या ठिकाणी आढळणाऱ्या महापाषाणीय स्तंभरचना या सूर्याच्या उगम व अस्ताच्या दिशेनुसार उभारलेल्या दिसतात. या स्तंभांच्या मांडणीमध्ये विशिष्ट खगोलीय संरेखन असून, हे पूर्वेस सूर्याच्या उगमाशी संबंधित असावे, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. याच प्रकारे विविध ठिकाणी असलेल्या दफनविधीमध्येही त्या संदर्भातील पुरावे पाहायला मिळतात जसे, काश्मीरच्या बुरझहोम येथे आढळलेल्या पूर्वाभिमुख दफनविधी या सूर्योपासनेशी संबंधित असाव्यात असा तर्क आहे.
*सूर्यपूजेचे धार्मिक बीज
प्रागैतिहासिक कालखंडात संस्थात्मक धर्म अस्तित्वात नव्हता; परंतु निसर्गपूजा हीच धर्माचे बीज होते, असे मानले जाऊ शकते. सूर्य, चंद्र, तारे, पाऊस, झाडे, प्राणी यांना देवत्व देण्याची प्रक्रिया या काळात सुरू झाली असावी. सूर्य हा त्यातील एक प्रमुख घटक ठरला कारण, त्याचे अस्तित्व प्रत्यक्ष आणि सर्वत्र अनुभवता येणारे होते. सूर्याचा नियमित उगम आणि अस्त, त्याचा जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर असणारा प्रभाव यामुळे तो दैवी शक्ती म्हणून ओळखला गेला असावा. त्याच्याशी संबंधित कर्मकांड अद्याप ठाम स्वरूपात अस्तित्वात नसले तरी भाविकता व श्रद्धेचा प्रारंभ निश्चितपणे या काळात झाला होता, हे नाकारता येणार नाही.
संपूर्णपणे पाहता प्रागैतिहासिक सूर्यपूजेची परंपरा ही जीवनपद्धती, खगोलज्ञान, पर्यावरणाशी संबंधित व्यवहार आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनांशी जोडलेली होती. भारतातच नव्हे, तर इतर संस्कृतींमध्येही सूर्यविषयक आकृती आणि प्रतिमा मानवाच्या धार्मिक उत्क्रांतीचा महत्त्वाचा भाग ठरल्या आहेत. यामुळे सूर्यपूजेचे मूळ वैश्विक असून, भारतीय परंपरेतील निसर्गपूजेच्या आद्यरूपांपैकी एक म्हणून ती अधोरेखित होते. त्यानुसार सूर्य हा केवळ दृष्टीस पडणारा प्रकाशाचा गोळा नव्हता तर जीवनाचा साक्षात आधार होता. याच श्रद्धेचे पुढे वैदिक, पुराणिक व राजकीय युगांमध्ये अधिक सुसंरचित रूपांत रूपांतर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT